चंद्रपूर :-येथील दुर्गापूर गावातील जनतेला अनेक कार्यासाठी चंद्रपूर व इतरत्र येणेजाणे करावे लागते. तसेच परिसरातील विद्यार्थिना शिक्षणासाठी आवागमन करावे लागते. चद्रपूर औष्णिक केंद्र असून यामध्ये नोकरी व अन्य कार्यासाठी लोकांना जावे लागते. पण या परिसरात एसटी, बस थांबा आहे परंतु शेड (प्रवासी निवारा) नसल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करण्याची वेळ आलेली आहे. याबद्दल परिसरातील जनतेनी एसटी, विभाग व स्थानीय स्वराज्य संस्थाना कैफियत सांगितली आहे, पण याकडे लक्ष धायला कोणालाही वेळ नाही.
Demand to make a shed at the bus stop (passenger shelter) at Durgapur, otherwise protest
उल्लेखनीय आहे की परिसरातील लोकप्रतिनिधी पण याबद्दल उदासीने दिसून येत आहे. याचा भुर्दंड परिसरातील जनतेला भरावा लगत आहे. आता पावसाळा सुरु आहे. भर पावसात प्रवाशांना छत्री घेऊन उभे राहावे लागत आहे. तर काही इतर दुकानाच्या शेडचा आधार होत आहेत
आश्चर्याची गोष्ट म्हणजे सदर एसटीचा थांबा दुर्गापूर ग्रामपंचायतीमा कार्यालयाजवळंच आहे पण हेतुपुरस्कार दुर्लक्ष होत आहे. जर एसटीचे शेड शीघ्र निर्माण करण्यात आले तर या परिसरातील जनतेचा फायदातर होईलच शिवाय एस-टीच्या उत्पन्नात भर पडेल. पण याकडे लक्ष घायला एस.टी. विभाग व ग्रामपंचायतीला वेळ नाही.
परिसरातील लोकप्रतिनिधींनी याकडे अविलंब लक्ष देउन विद्यार्थी व जनतेच्या सोयीसाठी दुर्गापूर येथे एसटी थांब्याला शेड बनवून देण्याची मागणी लोकांनी केली आहे. अन्यथा परिसरातील प्रवासी आंदोलन करतील.
0 comments:
Post a Comment