चंद्रपुर :-राज्य परिवहन महामंडळ च्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यासाठी 3 सप्टेंबर 2024 पासून राज्यव्यापी आंदोलन महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीचे नेतृत्वात पुकारले होते. त्यामुळे संपूर्ण राज्यात ST बंद होती. काल रात्री महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती ची मुख्य मंत्री एकनाथ शिंदे सोबत सकारात्मक बैठक होऊन झालेल्या बैठकीत त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यामुळे संप मिटला आहे. त्यामुळे आज पासून पुन्हा एसटी रस्त्यावर धावणार आहे.
From today Lal Pari ST will run on the road again
ST कर्मचाऱ्यांचा 'या' मागण्या मान्य...
१) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना १ एप्रिल, २०२० पासून सरसकट मुळ वेतनात ६५०० रुपये वाढ.
२) जुलै २०१६ ते जानेवारी २०२० या काळातील प्रलंबित महागाई भत्ता देण्यात येणार
३) शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ लागू
४) वेतनवाढीच्या २१०० कोटी रुपयांची शिल्लक रक्कम कामगारांना वाटप मिळणार.
५) वैद्यकीय सेवेतील कॅशलेस योजना कामगारांना लागू होणार
६) कर्मचारी आणि कुटुंबीयांना एसटीत फरक न करता १ वर्षाची मोफत पास सवलत मिळणार
७) आंदोलनातील कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई होणार नाही
महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व कामगारांचे अभिनंदन व आभार मानले आहे.
0 comments:
Post a Comment