Ads

शिक्षक दिनी शिक्षकांसाठी आज पालक रस्त्यावर उतरणार

चंद्रपुर :-सन १९४९ पासुन मोरवा येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा अविरत ७५ वर्षापासुन अस्त्वित्वात आहे. महामार्गाला शाळा लागून असल्याने मागील २०-२५ वर्षापासुन (संवर्ग १ मध्ये) मोडणारे ५३ वर्षाहुन अधीक वय असणारे, गंभीर दुर्धर आजाग्रस्त, घटस्पोटीत, किडणी, हृदयविकारी, अंध अपंग असे वयक्तिक आणी वैफलग्रस्त शिक्षक आणी कोर्टकेस औषधोपचार सुरु असलेले ज्यांचा एक पाय कोर्टात, एक पाय दवाखाण्यात असतो. त्यामुळे त्यांचे अध्यापन कार्याकडे दुर्लक्ष होते. कर्तव्यावर असतांना अक्षरशहः शाळेत खुर्चीवर झोपलेले शिक्षक वारंवार बघुन नाईलाजाने अध्याहुन अधीक पालकांनी हया शाळेतुन आपल्या पाल्यांना काढून इतर खाजगी शाळेत दाखल केल्याने हया शाळेला उतरती कळा लागली.
Parents will come out on the streets for teachers on Teachers' Day today
दिनांक ५ मार्च, २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, विवेक जॉनसन यांनी मोरवा शाळेला प्रत्यक्ष भेट देवून शाळेच्या पटसंख्येच्या घटत्या क्रमाचा आढावा घेतला त्यावर काय उपाययोजना करता येईल ? यावर बोलतांना नजीकच्या चारगांव जि.प. शाळेचा (वर्ग ५ वा) वर्ग शिक्षकासह हया शाळेत समायोजीत करता येईल, शिवाय जिल्हा परिषदेच्या शाळेतुन सुध्दा खाजगी शाळे समान गुणवत्तापूर्ण शिक्षण आणी सोई सुविधा पुरविण्याकडे जिल्हा प्रशासन लक्ष देत आहे. हया शाळेमध्ये अत्याधुनिक भौतिक सुविधा प्रशस्त ईमारत, क्रिडांगण, बाग-बगीचा तसेच (नवीन शिक्षकाची नियुक्ती) करण्यात येणार आहे. एक मॉडेल म्हणून भविष्यात हि शाळा वेगळेपणा सिध्द करणार यासाठी ही शाळा दत्तक घेतल्याचे वृत्त प्रकाशीत झाल्याने आम्ही खाजगी शिक्षण घेत असल्याने आपली पाल्य जि.प. केंद्र शाळा, मोरवा येथे दाखल केले.

इ. १ ते ५ पर्यंत पटावर ५२ विद्यार्थी असल्याने दोन सहाय्यक शिक्षक नियमानुसार मंजुर असतांना पैकी एका रिक्त पदावर चारगांव येथील शाळेच्या शिक्षकाला रिक्त पदी प्रतिनियुक्तीवर पाठवले सर्व काही सुरळीत चालु असतांना ऑगष्ट महिण्यात प्रविण डोर्लीकर आणी ज्योत्ना सुरावार यांना अतिरिक्त शिक्षकांना नियमाबाहय पध्दतीने प्रतिनियुक्तीवर पाठवले. ग्रामपंचायत आणी शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावासह निवेदने देऊन विरोध केला, तर त्या रिक्त पदी दोन्ही डोळयांनी अंध असलेल्या शिक्षकाला कायम पदस्थापना देवून आमच्या पाल्यांचे भवीष्य अंधारात ढकलल्याने आम्ही सर्व पालक टि.सी. देण्याची मागणी करत आहोत आणी हया बेजबाबदार मुजोर प्रशासनावर राष्ट्रीय बालहक्क सुराज आयोग आणी सक्तीचे शिक्षण कायदा २००९ तसेच महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम १९७९ अन्वये गरजेनुसार कारवाईची मागणी करणार आहेत. आपल्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरीता दिनांक ५ सप्टेंबर शिक्षकदीनी उपोषणाला बसण्याचा हया पत्रकार परीषदेच्या माध्यमातुन इशारा देत आहोत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment