जावेद शेख भद्रावती:-एका 42 वर्षे महिलेने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक ७रोज शनिवारला शहरातील जुना सुमठाणा येथे घडली. आम्रपाली संजय ब्राह्मणे, वय 42 वर्षे,राहणार सुमठाना, भद्रावती असे या मृतक महिलेचे नाव आहे. सदर महिलेच्या मृत्यूचे कारण कळू शकले नाही.
A woman committed suicide by hanging herself at home in Bhadravati.
घरातील सर्व लोक खाली असताना वरच्या मजल्यावरील खोलीत गळफास घेऊन सदर महिलेने आत्महत्या केली. घरच्या लोकांच्या लक्षात सदर घटना आल्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला. त्यानंतर भद्रावती पोलीसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे
0 comments:
Post a Comment