Ads

तयार होणार असलेले योग भवन समाजाच्या उन्नतीचे, एकतेचे, आणि आरोग्याचे प्रतीक ठरावे -आ. किशोर जोरगेवार

चंद्रपूर :-योगा, ध्यान, आणि आरोग्याचे महत्त्व आपणा सर्वांना माहीत आहे. आरोग्य हा आपल्या जीवनाचा मूलमंत्र आहे, आणि या या योगा भवनाच्या माध्यमातून आपण आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यसंपन्न जीवन मिळवावे. हे भवन केवळ योगाभ्यासाचे स्थान राहणार नाही, तर आरोग्य आणि मानसिक संतुलन साधण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तयार होणार असलेले योग भवन समाजाच्या उन्नतीचे, एकतेचे, आणि आरोग्याचे प्रतीक ठरावे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
Yoga Bhavan to be built will be a symbol of upliftment, unity and health of the society - Mla. Kishore Jorgewar
आमदार निधीतून तुकूम येथील योग भवनाच्या बांधकामासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी २५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. वासुदेव गाडेगोणे, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, रमेश भुते, अजय वैरागडे, उमेश आष्टनकर, वीणा खेडेकर, खंगार आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, मागील पाच वर्षांत मतदारसंघात मोठी विकासकामे करता आली, याचा आनंद आहे. अनेक मोठी कामे आपण या पाच वर्षांत मार्गी लावू शकलो. यात घुग्घूस आणि बाबूपेठ उड्डाणपूल पूर्णत्वास जात आहे. तर पवित्र दीक्षाभूमी येथे आपण जवळपास ५७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मतदारसंघातील विविध भागात ११ अभ्यासिकांचे काम सुरू आहे. अनेक समाजभवने उभी झाली आहेत, असे ते यावेळी म्हणाले.
योगाविषयी मोठी जनजागृती झाली आहे. प्रत्येक वार्डात योगा ग्रुप सक्रिय काम करत आहे. आपणही प्रत्येक योगा ग्रुप पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असून त्यांना शक्य ती मदत करत आहोत. शहारात ११ योगा शेड तयार करण्याचा संकल्प आपण केला आहे. यातील काही योगा शेडचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेण्याचा आणि या भवनाच्या माध्यमातून एकत्र येऊन आरोग्यदायी जीवनशैलीचे पालन करण्याचा संकल्प करा. असे आवाहन यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment