जावेद शेख भद्रावती:-Accident सायंकाळच्या वेळेस आपल्या शेतातून आपल्या गावाकडे दुचाकीने परत जात असलेल्या युवकाच्या दुचाकीस एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
47-year-old Man died in a collision with an unknown vehicle.
सदर घटना दिनांक 14 रोज सोमवारला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील कोंढा गावाजवळ घडली. अंकुश सुधाकर चिकटे,वय 47 वर्ष, राहणार पाटाळा. असे मृतक इसमाचे नाव आहे. सदर मृतक आपल्या एम एच 34ए एच74 76 या क्रमांकाच्या दुचाकीने कोंढा येथील शेतातून आपल्या गावाकडे जात होता. कोंढा गावाजवळ मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात सदर दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन आवश्यक ती कार्यवाई केली व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment