चंद्रपूर:-विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने राजकीय पक्षात अंतर्गत कलह अधिक वाढल्याचे समोर येत आहे. यापूर्वी ब्रम्हपुरी येथे एका कार्यक्रमात कांग्रेस च्या वरिष्ठ नेत्याने एक विशिष्ट समाजालाच निवडुन आणण्याचे वक्तव्य केल्याने जिल्ह्यात संभ्रमाची स्थिति निर्माण झाली. आता यांनी मंगळवारी पत्रपरीषदेत कांग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप करत चंद्रपुर जिला महिला कांग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
Chandrapur District Women's Congress District President resigns accusing senior Congress leaders of nepotism
नम्रता थेमस्कर यांनी सांगितले की चंद्रपूर जिल्ह्यातील कांग्रेस चे जेष्ठ नेते केवळ पक्षात घराणेशाहीला चालना देत आहे. पक्षाचे वरिष्ठ नेता पार्टीतले पदाधिकारी तसेच अल्पसंख्यांक समाजातील लोकांकडे दुर्लक्ष करून आपल्याच परीवारातील सदस्यांना निवडणुकीत उतरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी सांगीतले की पक्षा मधे राहुन 30 आंदोलने, 60 पेक्षा जास्त सोशल मिडियावर भाजपा व मोदी सरकार विरोधात व्हिडीओ तैयार केले. सोबतच महिला कांग्रेस कडुन कोविड काळात मदतीचा एक घास, पुरग्रस्तांना मदत, स्वाक्षरी अभियान, राखी महोत्सव यासारखे उपक्रम घेतले. याशिवाय महिला प्रदेश कांग्रेस कडून देण्यात आलेले सर्व कार्य वेळोवेळी पार पाडले. परंतु कांग्रेस पक्ष सर्वधर्म समभाव असुन सुध्दा मागील काही दिवसांपासून जे पक्षात बघायला मिळत आहे. त्यावरून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वधर्म समभावाला तिलांजली देण्यात येत आहे. पक्षाचे वरिष्ठ नेता वेळोवेळी जातीयवादी विधाने करून पक्षातील कर्तव्यनिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्तांच्या भावना दुखावित आहे. नुकत्याच पक्षाने विधानसभा निहाय इच्छुक उम्मीद्वारांची यादी मागितली होती. त्यांत नम्रता ठेमस्कर सह अनेकांनी अर्ज दाखल केले. परंतु त्यांना वरिष्ठांकडून अर्ज दाखल का केले असे विचारून टिका करून पदावरून काढून टाकण्याची अप्रत्यक्ष धमकी देण्यात येत असल्याची माहीती त्यांनी दिली. पक्षातील वरीष्ठ नेत्यांची मानसिकता पक्षातील कार्यकत्र्यांचे मनोबल खचवनारी असल्याची माहीती दिली.
राजीनामा देताना ठेमस्कर यांनी काँग्रेसच्या खासदारांवर थेट हल्ला चढवीत केवळ त्यांच्या कुटुंबाचा आणि निवडक समाजातील लोकांना पक्षात प्रोत्साहन देत असल्याने काँग्रेसमध्ये महिला व अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचे ते म्हणाले. कामगारांनी वारंवार विनंती करूनही त्यांच्या संस्थेतील योगदानाकडे दुर्लक्ष केले जात आहे. कार्यकत्र्यांनी केवळ सतरंज्या व खुर्च्याच उचलायच्या का असाही प्रश्न त्यांनी यावेळी केला. वरीष्ठांकडून आत्मसन्मान दुखावल्याने राजीनाम्याची भूमिका घेतली असल्याची माहीती त्यांनी पत्रपरीषदेत दिली. हा राजीनामा प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, प्रदेश महिला अध्यक्ष संध्या सव्वालाखे तसेच अखिल भारतीय कांग्रेस कमिटी महासचिव तसेच महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस महासचिव प्रभारी रमेश चेन्नीथला यांचे पाठविला असल्याची माहीती दिली.
--------------------------------
0 comments:
Post a Comment