सादिक थैम वरोरा: वेकोलिने वरोरा तालुक्यातील एकोणा गावाला जाणारा पूर्वपार रस्ता बंद करून गावकऱ्यांना नवीन रस्ता बांधून दिला. मात्र, हा रस्ता अतिशय अरुंद असून, अपघात होण्याची शक्यता असल्याने राज्य परिवहन महामंडळाने या गावात जाणारी बससेवा बंद केली होती. अखेर आज 10 ऑक्टोबर रोज गुरुवारपासून बस सेवा पूर्ववत सुरू केली आहे.
Finally start bus service at Ekone
त्यामुळे वरोरा ला शिक्षणासाठी येणाऱ्या एकोणा येथील विद्यार्थी, नागरिक व वृद्धांना होणारा त्रास दूर झाला आहे.एकोणा गावालगत वेकोलिची खुली कोळसा खाण आहे. वेकोलिने या गावाला जाणारा पूर्वपार रस्ता बंद करून गावकऱ्यांच्या रहदारीसाठी नवीन रस्ता बांधून दिला. परंतु हा रस्ता अतिशय अरुंद असून, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनास रस्ता देण्यासाठी बसला जागा नसल्याने बस फसण्याची शक्यता होती. तसेच नवीन रस्त्याच्या बाजूला नालाही आहे. या रस्त्याने कोळशाची वाहतूक करणारे ट्रकही येणे-जाणे करतात. त्यामुळे या जड वाहनांना जागा करून देताना बस नाल्यात पडण्याचा धोकाही आहे. त्यामुळे या रस्त्याने राज्य परिवहन मंडळाने बस नेण्यास नकार दिला होता.
यामुळे शिक्षणासाठी वरोरा ला येणारे विद्यार्थी व इतर कामासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. याचा विचार करून या रस्त्याची सुधारणा करून द्यावी अन्यथा एकोणा खाणीतून होणारी कोळश्याची वाहतूक थांबवण्याचा इशारा एका पत्रातून एकोणाचे माजी सरपंच महारत्न लोहकरे यांनी वेकोलीला दिला होता.याची दखल घेत वेकोलीने रस्त्याच्या कामात सुधारणा केली.
या रस्त्याची सुधारणा झाल्याचे पत्र ग्रामपंचायतने 7 ऑक्टोबर रोज सोमवारला बस आगर प्रमुख पुण्यवर्धन वर्धेकर यांना दिल्यामुळे आज 10 ऑक्टोबर रोज गुरुवारपासून बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आली. बस सुरू झाल्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
आज गावात बस येताच गावकऱ्यांनी बसचे चालक व वाहक यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी सरपंच महारत्न लोहकरे, आकाश डोंगरे,शुभम बोथले, मंगेश खोंडे,छगन हिरादेवे, अनिल भडके,हेमंत गुगल,अनिकेत उताणे, स्वप्निल भडके, विश्वनाथ चवले यांचे सह गावातील विद्यार्थी विद्यार्थिनी व एकोणावासी उपस्थित होते. बस आगर प्रमुखांनी बस सेवा सुरू केल्यामुळे विद्यार्थी व गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
0 comments:
Post a Comment