Ads

रयतवारी येथील अवैध सुगंधीत तंबाकु प्रकरणी महिलासह दोघांना अटक

चंद्रपुर :-दिनांक ०५/११/२०२४ रोजी पोउपनि विनोद भुरले, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर हे पोलीस स्टॉफसह मा. पोलीस अधिक्षक साहेब, चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयात प्रोव्हीशन, जुगार रेड, सुगंधीत तंबाकु तसेच इतर अवैध धंदयावर कार्यवाही करणे कामी रवाना होवुन पोलीस स्टेशन, रामनगर परिसरात पेट्रोलीग करीत असतांना मुखबिर व्दारे खबर मिळाली की,
Arrested in case of illegal flavored tobacco in Ryatwari
अमर गुप्ता रा. स्वतवारी कॉलरी, चंद्रपुर हा त्याचे रयतवारी कॉलरी येथील किराणा दुकानाचे मागील गोडावुनचे बाजुला लावुन असलेल्या टाटा कंपनीच्या ओमनी चार चाकी वाहनाच्या खाली असलेल्या सुंगधीत तंबाकुनी भरलेल्या पांढ-या रंगाच्या प्लॉस्टीक चुंगडया हया महिला रक्षा ठक्कर, रा. दुर्गापुर, जि. चंद्रपुर ही चालकासह घेवुन आलेल्या चार चाकी टाटा एस कंपनीच्या वाहनामध्ये भरत आहे अशा खबरे वरून नमुद आरोपीचे गोडातुनचे बाजुला असलेल्या चार चाकी वाहनाचे खाली असलेल्या प्लॉस्टीक चुंगडयांची तपासणी केली असता सुगंधीत तंबाकु असा एकुण १,००,४५०/- रूपयाचा माल मिळुन आल्याने आरोपी अमरजित ध्रुवप्रसाद गुप्ता, रा. रयतवारी कॉलरी, चंद्रपुर तसेच महिला रक्षा ठक्कर, रा. दुर्गापुर, चंद्रपुर यांचेवर पोलीस स्टेशन, रामनगर अप १०५६ २०२४ कलम २२३, २७५, १२३ भाण्यास सहकलम ३० (२), २६(२) (अ), ३, ४, ५९ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ प्रमाणे गुन्हा गोंद करून तपासात घेतला.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिदाक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद मुस्ले, पोहवा/सतिश अवथरे, नापोशि/संतोष येलपुलवार, पोशि/गोपाल आतकुलवार, पोशि/गोपीनाथ नरोटे, सर्व स्थानिक गुन्हें शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment