Ads

आदिवासी समाजाच्या विकासासाठी पूर्ण ताकदीने पाठीशी : ना. सुधीर मुनगंटीवार

पोंभुर्णा- दहा वर्षांच्या कार्यकाळामध्ये आदिवासी समुदायासाठी अनेक महत्त्वाची कामे करण्याचे भाग्य मला मिळाले. येत्या काळात सुद्धा आदिवासी समुदायासाठी अशीच विकासाची कामे करून समाजाचे हित साधले जाणार आहे. नेहमी साथ देणाऱ्या आदिवासी समाजाच्या पाठिशी पुढील काळात सुद्धा पूर्ण ताकदीने उभा राहील, अशी ग्वाही बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यावेळी आदिवासी बांधवांनी ना. श्री. मुनगंटीवार यांना एकजुटीने पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.
Backing with full strength for the development of tribal society: Min. Mr. Sudhir Mungantiwar
ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी (ता.11) पोंभुर्णा येथे आदिवासी समाजबांधवांशी संवाद साधला.या कार्यक्रमात आदिवासी समाजाचे नेते आणि
पोंभुर्णा येथील गोंडवाना गणतंत्र पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री.जगन येलके यांनी ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांना पाठींबा जाहीर केला. यावर उत्तर देताना श्री. मुनगंटीवार यांनी जगन येलके यांनी दिलेला पाठिंबा म्हणजे समाजाची सेवा करण्याचा संकल्प असल्याचे सांगितले.

येणाऱ्या काळामध्ये पोंभुर्णा तालुक्यातील 'पेसा' गावे म्हणून घोषणा होईल तेव्हा गावातील जनतेशी संवाद साधण्यासाठी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येतील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी दिला. ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘आदिवासी बांधवांची सेवा करण्याचा संकल्प करून अनेक वर्ष काम करत आहे. आदिवासी बांधवांसाठी तेंदुपत्ताचा बोनस २० कोटीवरून ७२ कोटी केला. नामवंत शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना शिकता यावे म्हणून अर्थमंत्री असताना निर्णय केला. ज्या गावात आदिवासी सरपंच आहे त्या गावांना ५ टक्के रक्कम देण्यासाठी २८५ कोटीचा विशेष निधी सरकारच्या तिजोरीतून देण्याचा निर्णय घेण्याचे भाग्य लाभले. शहरामध्येही शबरी घरकूल देण्याचा निर्णय घेण्यासाठी स्वत: लक्ष दिले. त्यामुळे आता शबरी घरकुलासाठी अडीच लाख रुपये मिळणार आहेत.’

सामाजिक सभागृह, वीर बाबुराव शेडमाके यांचे पोस्ट तिकीट केले. आता वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने १३७ कोटी रुपयांचे उत्तम स्टेडियम चंद्रपूर येथील म्हाडामध्ये करण्यात येणार आहे. १२ हजार ५०० पद निर्माण करणे, मुल आणि पोंभुर्णा शहराच्या मध्ये ४० हजार कोटीचा उद्योग प्रकल्प येत्या काळात सुरू करण्यात येणार आहे, असेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टीद्वारे नुकतेच ‘संकल्पपत्र’ जारी करण्यात आले. या वचननामा समितीचा अध्यक्ष म्हणून आदिवासींसाठी अनेक गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एमआयडीसीच्या माध्यमातुन आदिवासी तरुण, तरुणींना रोजगार देण्यासंदर्भात मुद्दा वचननाम्यामध्ये अंतर्भूत करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला. लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये दिले जाणार आहेत. शेतकरी बांधवांना मिळणाऱ्या १२ हजार रुपयांत वाढ करून ते १५ हजार करण्याचा निर्णय घेण्यात आला. वन जमीन पट्टे देण्यासोबतच त्या त्या ठिकाणी आदिवासींच्या अधिकाराचे रक्षण करण्याचाही संकल्प केला आहे, असेही ते म्हणाले.

बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचा आमदार आणि राज्याचा मंत्री म्हणून मागील दहा वर्षात पोंभुर्णामध्ये पक्के रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, श्री राज राजेश्वर मंदिर, तहसील कार्यालय, नगर पंचायत इमारत, उपकोषागार कार्यालय, व्यायामशाळा, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, इको पार्क, कार्पेट निर्मिती केंद्र, अगरबत्ती केंद्र, बांबू हँडीक्राफ्ट अँड आर्ट यूनिट म्हणजे ‘भाऊ’, कृषी कार्यालय, नगरपंचायत इमारत, स्टेडियम, भगवान वीर बिरसा मुंडा आयटीआय, पाणी पुरवठा योजना, तलावांचे सौंदर्यीकरण, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, आठवडी बाजार, स्मशानभूमी, भूमापन कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, वीर बाबुराव शेडमाके सभागृह, संत जगनाडे महाराज सभागृह, पत्रकार भवन, आदिवासी मुले आणि मुलींसाठी वसतीगृह, गावागावांत सिंचन योजना अशी अनेक कामे पूर्णत्वास नेल्याचे त्यांनी सांगितले. मागील पाच वर्षात २ वर्ष ८ महिने सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसने आपली पाच कामे तरी सांगावी, असे आव्हान ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. येणाऱ्या काळात प्रत्येकाला घरकूल, आदिवासी तरुणांसाठी विशेष योजना करून बळ देऊ, अशीही ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment