Ads

महायुती निवडून आल्यास महाराष्ट्राला गुजरातचे गुलाम करतील : मुख्यमंत्री रेवंत रेड्डी 

घुग्घूस : चंद्रपूर विधानसभेच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण पडवेकर यांच्या प्रचारार्थ आज 16/11/2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक लॉयड्स मेटल्स कंपनी परिसरात (Telangana Chief Minister Revanth Reddy) तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची जाहीर सभा पार पडली आपल्या संबोधनात रेड्डी यांनी महायुतीवर प्रचंड आगपाखड केली
एकनाथ शिंदे फडणवीस व अजित पवारयांच्या महायुती सरकारने राज्यातील उद्योगधंदे गुजरातला पळविले हे सरकार अडाणीच्या हातातले बाहुले आहेत यांना जर परत आपण राज्यातील सत्ता दिली तर हे सरकार तुम्हाला गुजरातचे गुलाम बनवितील निवडणुकीच्या तोंडावर बहिणीना पंधराशे रुपयांचा लॉलीपॉप दिला तर दुसरीकडे घरातील खाद्यपदार्था पासून प्रत्येक वस्तूवर महागाईचा तडका दिला
If elected, Mahayuti will make Maharashtra a slave of Gujarat: Chief Minister Revanth Reddy
महाराष्ट्रात आपण महाविकास आघाडीचे सरकार आणा प्रवीण पडवेकर यांना विजयी करा तेलंगनाच्या धर्तीवर महाराष्ट्राचा विकास करू व महाराष्ट्राच्या विकासात तेलंगना राज्य सदैव हातभार लावेल अशी हमी दिली
उमेदवार प्रवीण पडवेकर यांनी दोनशे युनिटचा गाजर दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या नेत्याला धडा शिकवा व तुमच्या पैकी एक असलेल्या काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला निवडून द्या अशी विनंती केली

सदर जाहीरसभेत नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला घुग्घूस शहर काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांनी केवळ एका दिवसात सभेची जवाबदारी घेतली व सभेला यशस्वी केले

आजच्या सभेत मंचावर प्रवीण पडवेकर, रितेश तिवारी काँग्रेस अध्यक्ष चंद्रपूर, ज्येष्ठ नेते विनायक बांगळे, माजी नगरसेवक नंदू नागरकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार महिला जिल्हाध्यक्ष बेबी ताई उईके, राष्ट्रवादी नेते दिपक जैस्वाल,युवक अध्यक्ष राजेश अड्डुर, तालुका अध्यक्ष अनिल नरुले, महिला जिल्हाध्यक्ष सुनंदा धोबे,ज्येष्ठ नेते नारायण ठेंगणे, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, माजी एस्सी सेल जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, माजी उपसरपंच सुधाकर बांदूरकर, शिवसेना उबाठा शहर अध्यक्ष बंटी घोरपडे, गणेश शेंडे, हेमराज बावणे,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अध्यक्ष दिलीप पिट्टलवार, शरद कुमार,सूरज कन्नूर, तौफिक शेख, माजी सरपंच शोभा ठाकरे, महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, विधानसभा निरीक्षक सुजाता सोनटक्के, ममता उपाध्ये, मंगला बुरांडे, संध्या मंडल, वैशाली दुर्योधन,व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment