राजुरा:-Assembly elections in Maharashtra संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्या नंतर सर्वच राजकिय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवत पदयात्रा, ऱ्यली, कॉर्नर सभा, पक्षप्रवेश, प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, कार्यकर्त्यांशी व मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला जात असुन राजुरा विधानसभेतही रात्रंदिवस या सर्व प्रक्रिया सुरू असल्याने राजुरा विधानसभेतील चारही तालुक्यात मोठ्याप्रमाणात रणधुमाळी बघायला मिळत आहे.
Who will win the double-header in Rajura Assembly constituency?
यावेळी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांना निर्विवाद उमेदवारी मिळाली. तर अत्यंत अतीटतीच्या ठरलेल्या निवडीत महायुतीचे उमेदवार म्हणून देवराव भोंगळे यांना तर महाराष्ट्रात प्रामुख्याने तिसरा राजकिय पर्याय म्हणून नव्याने तयार झालेल्या परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार म्हणून शेतकरी संघटना समर्थित स्वतंत्र भारत पक्षाचे नेते वामनराव चटप यांना सुरुवाती पासूनच उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. राजुरा विधानसभेत तिहेरी लढत होईल अशी शक्यता असतानाच महायुतीची उमेदवारी मिळविण्यााठी दोन माजी आमदारांनी व एका जेष्ठ भाजपा नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.मात्र पक्षाने अधिकृत उमेदवारी न दिल्याने शेवटी अपक्ष उमेदवार म्हणून भाजपा च्या दोन माजी आमदारांनी अपक्ष उमेदवार म्हणून नामांकन अर्ज भरले. शेवटी उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांच्या मध्यस्थीने दोन्ही अर्ज मागे घेण्यात भाजपाला यश मिळालं मात्र पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे महायुतीच्या अधिकृत उमेदवाराबद्दल नाराजी व्यक्त करत विधानसभेतील भाजपा पक्षातील कार्यकर्त्यांचा यांना कसा विरोध आहे हे सांगण्यात आले. त्यामूळे गृह कलहात बराचसा वेळ वाया गेला. यात पूर्वी पासूनच तयारीत असलेल्या महाविकास आघाडीचे सुभाष धोटे व परिवर्तन महाशक्ती च्या वामनराव चटप यांनी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत मुसंडी मारत तीहेरी लढतीला दुहेरी लढतीत परावर्तित केले. त्यामूळे सध्या महायुतीचे उमेदवार काहीसे बॅकफूटवर दिसत आहे. अश्यातच सुभाष धोटे यांचा राष्ट्रीय पक्ष असल्याने त्यांची यंत्रणा पूर्वीपासूनच गावपातळीवर तयार होती. आमदार म्हणून केलेल्या विकास कामांचा व कार्यकर्त्याच्या मोठ्या फळीचा फायदा घेत सुभाष धोटे यांनी विवीध पक्षातील कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश देत प्रचाराचा धुरळा लावला आहे. त्यातच लोकसभेत खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या विजयाचे शिलेदार म्हणून सुभाष धोटे यांची ख्याती आहे. त्याचीच परतफेळ म्हणून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजुरा विधानसभेत विशेष लक्ष घातल्याने सुभाष धोटे यांचा विजयाचा मार्ग सुखर होतांना दिसत आहे. वामनराव चटप यांनी सुद्धा प्रचारात चांगलीच मुसंडी मारली असुन ते प्रचंड परिश्रम घेत आहेत. त्यातच दोन्ही माजी आमदारांची नाराजी दूर झाली की नाही यावर देवराव भोंगळे यांचा विजयरथ पुढे जाणार आहे. दोन वर्षांपासून देवराव भोंगळे यांनीही विधानसभेत कार्यक्रमांचा व सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून जनतेची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. परंतु राजुरा विधासभेतील चौदा उमेदवारांपैकी नेमकी कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते हे मतदाना नंतरच मतदार राजा ठरवेल.
0 comments:
Post a Comment