Ads

रांगोळी साकारून मतदान करण्याचा संदेश:मूल येथील आधार केंन्द्र व सेतू केंन्द्र तहसील कार्यालय मूल जागृतीसाठी उपक्रम

मुल /नासिर खान :-  बल्लारपूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने मतदानाचा टक्का वाढण्यासाठी विविध उपक्रम राबवून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. मूल येथील आधार केंन्द्राच्या संचालीका वैशाली चूनारकर ,पराग खोब्रागडे तसेच आधार सूपरवायझर आरती पांडे, मयूरी रामटेके,आरती बंडीवार,खूशी,कोमल हजारे,सेतू केंन्द्रातील गजू रायपूरे संचालक,पराग खोबा्रगआॅपरेटर विवेक मुनगेलवार, मतदान करण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Message to vote by making Rangoli: Aadhar Kendra and Setu Kendra Tehsil Office at Mool are initiatives for Mool awareness.
Voting is our right, we must exercise it' "मतदान हा आपला अधिकार आहे, तो आपण पार पाडला पाहिजे'असा संदेश देत मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत शाळा, विविध संस्था, संघटना प्रयत्न करत आहे. मूल येथील आधार केंन्द्र व सेतू केंन्द्र नेही मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी पाऊल उचलले आहे. मतदान करण्यासाठी विविध प्रकारे नागरिकांना प्रोत्साहीत केले जात आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. तसेच मार्गदर्शन केले जात आहे.

दिवाळी व इतर सण-उत्सवाच्या काळात रांगोळी काढून विविध शासकीय उपक्रमासंदर्भात तसेच विविध योजनांबाबत माहिती देत असतात. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून विविध कार्यक्रमप्रसंगी रांगोळी साकारून त्या मतदान करण्याचा संदेश देत आहेत. याच अनुषंगाने त्यांनी गुरूवार, दि. 14 नोव्हेंबर रोजी आपल्या तहसील कार्यालयातील आधार केंन्द्र व सेतूच्या समोर रांगोळी साकारून "विधानसभा निवडणुकीत आपले मतदान हे मोलाचे आहे', "एक दिवस मतदानासाठी लोकशाहीच्या हितासाठी', "आपल्या मताचे दान, आहे लोकशाहीची शान', "माझे मत माझा अधिकार,"My Vote is my right, अशा संदेशाच्या माध्यमातून नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहीत करणारी रांगोळी साकारली. मूल तहसील मध्ये येणा—या नागरीकांना कडून उपक्रमाचे कौतूक होत आहे.

नागरिकांकडून कौतुक आधार केंन्द्राच्या आॅफरेटर कडून जनजागृतीपर उपक्रम राबवले जातात. याच मालिकेत आता मतदानासाठी जनजागृती केली जात आहे. मतदानासाठी करण्यात येणाऱ्या जनजागृतीच्या प्रयत्नांना नागरिकांचा प्रतिसादही मिळत आहे. मूल येथील तहसिलदार मृदुला मोरे यांनी उपक्रमाची प्रशांसा केली तसेच नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment