बल्लारपूर :-जिल्ह्याचा समतोल विकास साधताना आरोग्य, शिक्षण, कृषी, सिंचन, क्रीडा, पर्यटन आणि रोजगार आदी क्षेत्राच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. बल्लारपूर मतदारसंघाच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. ल्लारपूर तालुक्याची निर्मीती करुन विविध विकासकामे मतदारसंघात पूर्णत्वास आणली. बल्लारपूर शहरामध्ये विविध जाती-धर्माचे लोक वास्तव्यास असून सर्व जाती धर्मीयांच्या कल्याणासाठी व प्रगतीसाठी कार्य केले. यापुढेही असाच आशीर्वाद कायम राहील्यास बल्लारपूरचा गौरव वाढविण्यासाठी विकासकामांना चालना देण्यात येईल, अशी ग्वाही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
Promotion of development works to enhance the glory of Ballarpur -Min. Sudhir Mungantiwar
ट्रक असोसिएशन तर्फे आयोजित भव्य रॅलीनंतर जाहिर सभेत त्यांनी नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी नागरिकांनी रॅलीचे दमदार स्वागत केले. सर्वसामान्यांच्या व कष्टकऱ्यांच्या सेवेसाठी माता-भगिनींचा आशिर्वाद लाख मोलाचा असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी ना.मुनगंटीवार म्हणाले, ‘बल्लारपूर शहराला ‘मिनी इंडिया’ असे संबोधले जाते. याठिकाणी विविध जाती-धर्माचे लोक वास्तव्यास आहेत. येथे वास्तव्यास असणारे, मुस्लिम बांधव, उत्तर भारतीय बांधवासाठी काम केले. विकासकामांच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून बल्लारपूर शहराचा गौरव वाढवण्याचे कार्य केले. नागरिकांच्या मागणीनुसार बल्लारपूर तहसीलची निर्मिती आणि यासोबतच एसडीओ कार्यालय उभारले. कच्च्या घरात राहणाऱ्या बल्लारपूरातील नागरिकांना येत्या पाच वर्षात घरकुल उपलब्ध करुन देण्यात येणार असून डब्ल्यूसीएलच्या जागेवर जमिनीचे पट्टे देण्याचा निर्णय करण्यात आला आहे. बचत गटाच्या उत्पादित वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी चंद्रपूरमध्ये बाजारहाट निर्माण केली जात आहे.’
*ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ बल्लारपूर येथे भव्य रॅली:*
बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ ट्रक असोसिएशन तर्फे ऐतिहासिक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गोल पुलीया बल्लारपूर येथून सुरु झालेल्या रॅलीमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते.
*बल्लारपूर शहरातील विविध विकास कामे:*
अत्याधुनिक सैनिकी शाळा, एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र, नगरपरिषद इमारत, सांस्कृतिक सभागृह, नाट्यगृह, बस स्थानक, सर्वांगसुंदर रेल्वे स्टेशन, शहरातील तसेच अंतर्गत सिमेंट रस्ते, क्रीडा संकुल, विविध ठिकाणचे स्टेडियम, बॉटनिकल गार्डन, पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, पाण्याची व्यवस्था, छठघाट आदी विकास कामे करण्यात आली.
0 comments:
Post a Comment