Ads

चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजच्या साहित्य खरेदीसाठी 100 कोटी रुपयांचा निधी द्या - आ. किशोर जोरगेवार. Provide a fund of Rs 100 crore for the purchase of materials for the medical college in Chandrapur - MLA. Kishor Jorgewar.

चंद्रपुर :- चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र येथे आवश्यक वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची गरज असून, सदर मेडिकल कॉलेज रुग्णसेवेसाठी तात्काळ सुरू करण्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात यावाअशी मागणी अधिवेशनात औचित्याच्या मुद्यावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

शनिवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर मतदार संघातील प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना त्यांनी चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजचा विषय उचलत साहित्य खरेदीसाठी 100 कोटी रुपये देण्यात यावेअशी मागणी केली आहे.

Provide a fund of Rs 100 crore for the purchase of materials for the medical college in Chandrapur - MLA. Kishor Jorgewar.

  बहुप्रतिक्षित चंद्रपूर मेडिकल कॉलेजची सुमारे ५० एकरातील नवीन वास्तूचे बांधकाम पूर्णत्वास आले असले तरी वैद्यकीय साहित्य आणि फर्निचरसाठी निधी उपलब्ध झाला नाही. साहित्य खरेदीसाठी सुमारे १०० कोटी रुपयांची आवश्यकता असूनतातडीने हा निधी मिळावा म्हणून कॉलेज प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. नवीन इमारतीत लाकडी फर्निचरसाठी ५७ कोटी रुपये तर वैद्यकीय साहित्यासाठी ४१ कोटी ७६ लाख रुपयांची आवश्यकता आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.  मात्र सदर  प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

   लगतच्या गडचिरोलीयवतमाळतेलंगणातील आसिफाबादकरीमनगर या भागातील रुग्णसुद्धा चंद्रपुरात उपचारासाठी येत असतात. सध्याच्या परिस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीत मेडिकल कॉलेज सुरू आहे. दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हा सामान्य रुग्णालयात खाटांची संख्या कमी पडत आहे. रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. निवासी डॉक्टरांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत असल्याने नव्या जागेतील इमारतीत कॉलेज हलविण्यात यावेअशी सातत्याने मागणी होत आहे. परंतुआवश्यक साहित्य खरेदीसाठी निधी उपलब्ध झालेला नसल्याने सर्व काम रखडले आहे.

  हाच विषय आता आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उचलून धरला. यावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कीमेडिकल कॉलेजचे काम पूर्ण झाले आहे. परंतु साहित्य खरेदी करण्यासाठी लागणारे 100 कोटी रुपये न मिळाल्याने रुग्णालय बंद आहे. अतिशय सुंदर परिसरात सुंदर वास्तू तयार झाली असली तरी फर्निचर आणि वैद्यकीय साहित्य नसल्याने रुग्णालय सुरू होत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तात्काळ साहित्य खरेदीसाठी 100 कोटी रुपये देण्यात यावेतअशी मागणी त्यांनी यावेळी सभागृहात केली आहे.


चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या भरती प्रक्रियेवर आमदार किशोर जोरगेवार अधिवेशनात संतापले.

परीक्षा दोन दिवसांनी पुढेपरीक्षा पारदर्शक पद्धतीने स्थानिक केंद्रावर घेण्याच्या सूचना

 

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील नोकरी भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्रसदर परीक्षा विदर्भातील लगतच्या जिल्ह्यांमध्ये न घेता पुणेनाशिक या दूरच्या जिल्ह्यांमध्ये घेतली जात आहे. यामुळे उमेदवारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या भरती प्रक्रियेत मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप असूनसदर भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावीअशी मागणी अधिवेशनात औचित्याच्या मुद्यावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या लिपिक 261 आणि शिपाई 97 अशा 358 पदांसाठी 31,156 उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. राज्यातील जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जात आहे. मात्रया परीक्षेत मोठा आर्थिक व्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत. एका उमेदवाराकडून 40 लाख रुपयांपर्यंत पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी येत असल्याचा आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलताना केला आहे. यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले कीचंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील नोकरी भरतीची जाहिरात निघाली. त्यानुसार 21, 22 आणि 23 डिसेंबरला परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र ही परीक्षा चंद्रपूरनागपूर किंवा विदर्भातील लगतच्या जिल्ह्यांमध्ये न घेता पुणेनाशिक अशा दूरच्या जिल्ह्यांमध्ये घेतली जात आहे. राज्यातील 31,156 उमेदवारांनी अर्ज केला आहे. मात्रया परीक्षा प्रक्रियेबाबत अनेक उमेदवारांच्या मनात शंका आहेत. एका जागेचा 40 लाख रुपये असा दर असल्याच्या तक्रारी असूनसदर परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हावीअशी मागणी अधिवेशनात बोलताना त्यांनी केली आहे.

 

रद्द झालेल्या परीक्षेतील उमेदवारांना स्थानिक परीक्षा केंद्र द्या – आ. किशोर जोरगेवार
 
आज चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या उमेदवारांची परीक्षा होती. मात्रपेपर देत असताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्या. प्रश्नाचे उत्तर लिहिल्यानंतर ते सेव्ह करताच लिहिलेले उत्तर बदलत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यानंतर याची दखल घेत अर्धा तास पेपर झाल्यावर सदर पेपर रद्द करून परीक्षा दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आली. मात्रया प्रकारानंतर विद्यार्थ्यांमध्ये रोष असूनयाबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी वरिष्ठ अधिकारी आणि परीक्षा घेणाऱ्या दिल्ली येथील आयटीआय लिमिटेड कंपनीचे ओडीएस प्रविण सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असूनआता पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा उमेदवारांच्या स्थानिक केंद्रावरच घेण्यात यावी. त्यांना पुन्हा बाहेर जिल्ह्यात केंद्र देऊन आर्थिक भुर्दंड लादू नयेअशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. सदर कंपनी व्यवस्थापनाने ही आता पुढील परीक्षा स्थानिक केंद्रावर घेण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे पुढील वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या सोयीच्या केंद्रांवर ही परीक्षा घेतल्या जाणार आहे.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment