Ads

वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्राचा विकास करण्यासाठी कटीबद्ध -नवनियुक्त आमदार करण देवतळे

सादिक थैम:-वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेले युवा आमदार करण संजय देवतळे यांच्या जाहीर आभार सभेचे आयोजन 30 नोव्हेंबर 2024 ला शहरातील आंबेडकर चौकात करण्यात आले होते.
Committed to the development of Warora-Bhadrawati assembly constituency
Newly appointed MLA Karan Devtale
याप्रसंगी आमदार करण देवतळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले माजी मंत्री स्व. दादासाहेब देवतळे, माजी मंत्री संजय देवतळे यांनी सामाजिक, शिक्षण, सहकारक्षेत्रात अनेक विकासात्मक प्रगत कामे केली आहे. त्यांनी कधीही अवैध कामे केली नाही हा विश्वास होता. माजी खासदार हंसराजभैय्या अहिर यांचा आशीर्वाद आणि मेहनत तसेच महायुतीचे घटक पक्षांनी दिलेला साथ यामुळे मी आमदार म्हणून निवडून आलो.
निवडणुकीत पुढे जात असताना माझे काका डॉ. विजय देवतळे माझ्या पाठीशी खंबीरपने उभे आहे तर विरोधकांनी सोशल मीडियाचे माध्यमातून मला बदनाम करण्याचे काम केले. मला महायुतीची उमेदवारी मिळाली तर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकायला सुरुवात झाली. क्षेत्रातील मागील दहा वर्षांपासून अनेक विकासकामे रखडली आहेत. पांदन रस्ते बघितले भूमिपूजन झाले असून बोर्ड लागले आहे परंतु रोड कुठे गायब झाला पता नाही. आपल्या भागात उद्योग कंपन्या आहे. या कंपन्यामध्ये नोकरीं मागण्यासाठी स्थानिक युवक गेले तर लोकप्रतिनिधीकडून कंपनीला पैसे द्यावे लागतात असे सांगण्यात येत होते. यापुढे स्थानिक उद्योग कंपनीमध्ये स्थानिकांना नोकरीसाठी एकही रुपया द्यावा लागणार नाही. अशी ग्वाही आमदार करण देवतळे यांनी दिली आहे. दहा वर्ष हुकूमशाहीचे राजकारण होते. हुकूमशाहीला आळा बसविण्यासाठी आपण यशस्वी झालो आहे. मी राजकारणात नवखा नसून माझे वडील संजय देवतळे यांचे सुसंस्कृत राजकीय संस्कार व अनुभव माझ्या अंगी पूर्वीपासूनच आहे. मी क्षेत्राचा विकास साधताना आमचे आदर्श राजकीय गुरु जेष्ठ माजी खासदार हंसराज अहिर, डॉ. विजय देवतळे, रमेश राजूरकर यांचे मार्गदर्शन मी सदोदित घेत राहणार असून घटक पक्षांनाही विश्वासात घेऊनच विकासाचा गाडा चालवीणार आहे.तसेच चार -पाच महिन्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर व आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे नेतृत्वात लढून जी. प., प. स. नगरपालिका निवडणुका लढवून जिकण्याचा मानस ठेवला आहे. जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटीबद्ध असल्याचे मत आमदार करण देवतळे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले आहे.

हरलो तर लाजायचे नाही आणि जिंकलो तर माजायचे नाही

2019 च्या विधानसभा निवडणुकीत स्व.संजय देवतळे यांचा पराभव झाला. रात्री 10.30वाजता जेवण केले. त्यानंतर संजय देवतळे हे आराम करण्याचे तयारीला लागले असता आमदार पुत्र करण देवतळे यांनी आपल्या वडिलांना म्हणाले साहेब आपला पराभव झाला असून तुम्ही इतक्या लवकर आराम करीत आहे. तेव्हा ते म्हणाले हरलो तर लाजायचे नाही आणि जिंकलो तर माजायचे नाही. असा पिता -पुत्राचा संवादाचा किस्सा आमदार करण देवतळे यांनी आभार सभेत विषद केला.
आभारसभेच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर हे होते. तर प्रमुख अतिथी रमेश राजूरकर, डॉ. विजय देवतळे, बाबाराव भागडे,शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते, राष्ट्रवादी काँग्रेस चे वरोरा -भद्रावती विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, आरपीआय चे सुनील गायकवाड, वानखेडे, बाळू भोयर, सुनीता काकडे, विजय मोकाशी, विठ्ठल लेडे,रंजना पारशीवे आदी महायुती घटक पक्षाचे नेते मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रास्ताविक भाजपाचे जेष्ठ नेते बाबाराव भागडे यांनी केले.
याप्रसंगी माजी खासदार हंसराज अहिर, डॉ. विजय देवतळे,भाजपाचे वरोरा -भद्रावती विधानसभा अध्यक्ष रमेश राजूरकर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, राष्ट्रवादी काँग्रेस चे विलास नेरकर,बाळू भोयर, आरपीआय चे वानखेडे या मान्यवरांनी आमदार करण देवतळे यांच्या विजयाबद्दल व विकासाबाबत आपले विचार मांडले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment