चंद्रपूर :- कंपनीतील मृत अजय रवींद्र राम या कामगारास आर्थिक मदत देण्याबाबत काय कार्यवाही केली, अशी विचारणा आमदार अडबाले यांनी केली. यावर सध्या २ लाख रूपये कामगाराचे वारसदाराला दिलेले असून उर्वरित नुकसानभरपाईची रक्कम नियमानुसार देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच जून महिन्यात सदर कंपनीत श्यामसुंदर ठेंगणे या कामगाराचा मृत्यू झाला होता. त्यास ४५ लक्ष वारसदारांना देण्यात येईल, असे कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले होते. त्यातील ३० लक्ष देण्यात आले असून १५ लक्ष रुपये आतापर्यंत कंपनीने का दिले नाही, याची विचारणा केली. याबाबत उर्वरित रक्कम नियमानुसार देण्यात येईल, असे कंपनी व्यवस्थापकांनी सांगितले.
सोबतच सदर कंपनीचे स्ट्रक्चरल ऑडिट, कंपनीत कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, प्रदूषण नियंत्रणार्थ उपाययोजना, शेतपिकांचे होणारे नुकसान, परप्रांतीय कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशन, कामगारांना नियमानुसार वेतन व इतर बाबींवर चर्चा करण्यात आली असून या सर्व बाबींची सविस्तर माहिती सहायक कामगार आयुुक्तांनी द्यावी, अश्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी केल्या. तसेच याच विषयांवर जिल्हाधिकारी, फॅक्टरी निरीक्षक, सहायक कामगार आयुक्त यांच्यासोबत कंपनी व्यवस्थापनाची बैठक लावणार असल्याचे आमदार अडबाले यांनी सांगितले.
बैठकीला सहायक कामगार आयुक्त श्री. धुर्वे, ताडाळी उपसरपंच निखीलेश चामरे, प्रा. रवी झाडे व कंपनी अधिकारी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment