कोठारी:- वाढदिवस म्हटलं की थाटामाटात साजरा केल्या जातो. मात्र, तोहोगाव येथील माजी विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिक्षणाचे ज्ञानार्जन करणाऱ्या शिक्षिकेचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करून ऋण फेडले. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी थेट आपल्या शिक्षिकेच्या घरी पोहोचत वाढदिवस साजरा करून त्यांना अचंबित केले. माजी विद्यार्थ्यांनी वाढदिवस साजरा करून त्यांच्या निष्ठेबद्दल भावना व्यक्त केल्या.
Former students repay teacher's debt by celebrating unique birthday
तोहगाव जिल्हा परिषद शाळेत १९९६ ला इयत्ता ७ वीत शिकविणाऱ्या वर्ग शिक्षिका रजनी अल्याडवार यांचा नुकताच वाढदिवस झाला. या शिक्षिकेने शिकविलेल्या १९९६ च्या बॅचचे माजी विद्यार्थी बंडू गौरकर, योगेश खामनकर, अजय जिरकुंटवार, मनोज गराडे, साईनाथ कुचनकर, दिवाकर चिडे, गजानन मोरे, कृष्णा भगत, रितेश लोहकरे यांनी एकत्र येत आपल्या व्यस्ततेतून वेळ काढून शुभेच्छा देण्याकरिता वर्गशिक्षिकेच्या घरी पोहोचून त्यांचा वाढदिवस साजरा केला.
सर्व विद्यार्थ्यांना आपल्या घराच्या दारात बघून शिक्षिका रजनी अल्याडवार यांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, विद्यार्थ्यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी आल्याचे सांगितल्यानंतर त्याही अचंबित झाल्या. मात्र, विद्यार्थ्यांनी अनोखा पद्धतीने वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या. यावेळी केक कापण्यात आला. मिठाई भरविण्यात आली. तुमचा वाढदिवस ज्ञानाच्या आनंदाने आणि नवीन कल्पनेने भरलेला असावा, बुद्धी, संयम, आणि
काळजी यामुळे शिकण्याचा प्रवास आनंददायी झाला आहे, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. माझ्या जीवनातील सर्वात मोठा क्षण असून मला मिळालेले मोठे बक्षीस भावना त्यांनी व्यक्त केली. जवळपास पंचवीस ते सत्तावीस वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केल्याचा क्षण शेवटपर्यंत लक्षात राहील, अशा भावना वर्गशिक्षिकेनी यावेळी व्यक्त केल्या. आणि सर्वांचे आभार व्यक्त करत सर्वांना आशीर्वाद दिला. यावेळी अन्य वर्गमित्रांची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment