चंद्रपूर - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ विभाग नागपूरच्या चंद्रपूर गटकार्यालया अंतर्गत ललित कला भवन बंगाली कॅम्प चंद्रपूर येथे गटस्तर कार्यक्रम लोकनृत्य स्पर्धा दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी मा. रविराज ईळवे साहेब कल्याण आयुक्त,मुंबई व मा.नंदलाल राठोड साहेब उपकल्याण आयुक्त नागपूर मुंबई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली स्पर्धा संपन्न झाली.
Naginabagh Colony Chandrapur's Hojagiri dance wins first place in Maharashtra Workers Welfare's folk dance competition
सदर स्पर्धेच्या स्पर्धेचे परीक्षक मा. पुनम झा, मा.आनंद इंगोले, मा. विजेंद्र टेंभुर्णे, कामगार कल्याण अधिकारी रामेश्वर हरिश्चंद्र अळणे व मा. किसनराव नागलकर, एम.एस.ई.बी.चंद्रपूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सुधाकर काकडे गुणवंत कामगार तथा वरिष्ठ व्यवस्थापक वित्त व लेखा (सेवानिवृत्त) चंद्रपूर प्रमुख पाहुणे मा. प्रा.योगिनी प्र. देगमवार पर्यवेक्षिका लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर, मा. दिगंबर श्रीराम इंगळे नेपथ्यकार तथा कामगार चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र हे होते.
लोकनृत्य स्पर्धेत उत्कृष्ट संघ प्रथम नगीना बाग वसाहत बंगाली कॅम्प चंद्रपूर होजागीरी नृत्य,
द्वितीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र वर्धा गोंधळ,
तृतीय क्रमांक ललित कला भवन बंगाली कॅम्प चंद्रपूरचे ३६ गडी नृत्य यांनी बक्षीस पटकावले.
राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धा दि.१४ फेब्रुवारी २०२५ रोजी नांदेड येथे होणा-या स्पर्धेसाठी नगिनाबाग वसाहत चंद्रपूरचा चा होजागीरी नृत्य- ञिपुरा हा संघ पात्र ठरला आहे.या गटस्तरीय स्पर्धेला चंद्रपूर,गडचिरोली व वर्धा जिल्ह्यामधून आठ संघ सहभागी झाले होते.
प्रास्ताविक रामेश्वर अळणे कामगार कल्याण अधिकारी चंद्रपूर यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन व आभार प्रदर्शन किरण उपरे यांनी केले.
0 comments:
Post a Comment