राजुरा :- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त स्वच्छता रॅली काढून विद्यार्थांनी स्वच्छतेचा संदेश देऊन राजुरातील प्रसिध्द प्राचीन देवस्थान सोमेश्वर देवस्थान सोमनाथपूर वार्ड येथील येथे श्रमदान करून संपूर्ण मंदिराची स्वच्छता करण्यात आली .
Cleanliness rally at Ashadevi School on the occasion of Sant Gadge Baba's death anniversary.
तसेच या शाळेतील विद्यार्थांसाठी स्वछतेवर आधारित स्लोगन स्पर्धा घेण्यात आली अतिशय उत्साहात विद्यार्थांनी स्लोगन तयार करून आणलेत व स्लोगन स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थना पेन देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक दिपक सातपुते यांनी संत गाडगेबाबा यांच्याबद्दल विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन केले, सहाय्यक शिक्षक बंडू बोढे, दिपक मडावी, सोनाली नक्षिने, सविता गेडेकर, वैशाली बोबडे, नेहा तळवेकर यांच्या सहकार्याने शाळेचे विद्यार्थि सहभागाने हा कार्यक्रम उत्तम रित्या पार पडला. संचालन बंडू बोढे यांनी केले तर आभारप्रदर्शन कु सोनल नक्षीने यांनी केले.
0 comments:
Post a Comment