घुग्घूस : नुकत्याच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाला आश्चर्यकारक रित्या बहुमत मिळालं आहे निवडणुकीत जय - पराजय हे चालत असतात मात्र या निवडणुकीत ज्याप्रमाणे विरोधीपक्ष ही शिल्लक राहिला नाही हे अविश्वसनीय आहे लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी देशातील निवडणुका या पारदर्शक होने अंत्यन्त महत्वाचे आहे मतादारांना आपला मत आपण दिलेल्या उमेवारालाच मिळाला याचा विश्वास असणं आवश्यक आहे.
देशातील EVM अर्थात Electronic Voting Machine ही सत्ताधारी पक्षासाठी Electronic Victory Machine झाल्याचे चित्र देशभरात दिसत आहे.
A march from Ghugus to Chandrapur District Collectorate to demand that the upcoming Municipal Corporation, Municipal Council and District Council elections in Maharashtra be held on ballot papers.
शेतमालाला उत्पादन खर्चाचा निम्म्याहुन कमी भाव, शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा जसे खते, बियाणे, कीटकनाशके, तणनाशके, मजुरी, ट्रॅक्टर, मोटार सायकल,टायर, पाईप, डिजल पेट्रोल, वैरण, ढेप, मोबाईल, डेटा, सर्वच वस्तू महागल्या उद्योगधंदे बंद पडलेत? राज्यात लाखो सुशिक्षित बेरोजगार आहे, सरकारने हजारो सरकारी शाळा बंद केल्या गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर हल्ला केला राज्यातील उद्योगधंदे गुजरातला पळविले इतकी विषमता असतांना केवळ लाडक्या बहिणीच्या पंधराशे रुपयात राज्यात विरोधीपक्ष ही शिल्लक उरू नये अशी परिस्थिती निर्माण झाली यावर विश्वास बसतोय कुणाचा? 288 जागेपैकी भाजप व मित्र पक्षाने 235 जागा जिंकाव्या हे विश्वास करण्या पलीकडील बाब आहे.
इतका मोठा विजय भाजप मित्रपक्षाला मिळाला आणी जर जनतेने निवडून दिले तर जनतेत उत्साह दिसून आला असता मात्र संपूर्ण महाराष्ट्रात वेगळाच चित्र दिसत आहे जनतेत प्रचंड नैराश्य दिसून येत आहे विजयी उमेदवार व त्यांचे समर्थक सोडल्यास प्रत्येक व्यक्ती हा इव्हिएम मुळेच महायुतीचा विजय झाल्याचा मान्य करीत असल्याचे स्पष्ट चित्र सर्वत्र दिसत आहे इव्हिएम मशीन व निवडणूक आयोग दोघांना सर्वसामान्य जनता संशयस्पद दृष्टीने बघत आहे निवडणुका या पारदर्शक होने महत्वाचे आहे.
जगातील 195 पैकी केवळ पाच ते दहा देशच इव्हिएमचा वापर करतात अमेरिके जर्मनी, ब्रिटेन सारख्या प्रगत देशातील निवडणुका ही बॅलेट पेपरवरच होत असतात अनेक देशांनी इव्हिएमचा वापर केला व ते असुरक्षित वाटल्याने परत बॅलेटचा वापर शुरु केला. भारतातील सर्वोच्च न्यायालयातील बुद्धीवंत वकीलांचा समूह,जगातील प्रसिद्ध वैज्ञानिक एलन मस्क हा सुद्धा इव्हिएम मशीनचा विरोध करतोय लोकशाहीत जनता ही सर्वोच्च असे मानले जाते मग जनतेचा विरोध असतांना निवडणूक आयोगाला व भाजपाला इव्हिएमचा इतका पुळका कशासाठी? जर इव्हिएम मध्ये घोळ शक्य नसेल तर इव्हिएमची जबरदस्ती कशासाठी? होऊ द्या निवडणुका बॅलेटवर! राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगितेत सांगतात 'गाव हा विश्वाचा नकाशा "गावावरून देशाची परीक्षा अर्थात गावावरून देशाची परिस्थिती माहित होते " मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी स्वतःच्या खर्चातून सत्य तपासण्यासाठी बॅलेटवर निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला असता पोलीस बळावर बॅलेटवरची निवडणूक होऊ दिली नाही उलट त्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले देशात लोकशाही असतांना ही दडपशाही कशासाठी असं काय बाहेर आलं असतं जे सरकारने येऊ दिले नाही?
हे सरकारची दडपशाही स्पष्ट करीत आहे की इव्हिएम मुळेच यांचे सरकार सत्तेत येत आहे या विरोधात खासदार प्रतिभा ताई धानोरकर माजी विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार माजी आमदार सुभाष धोटे आमदार सुधाकर अडबाले यांच्या मार्गदशनात राजुरेड्डी व अनिल नरुले यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 23 डिसेम्बर 2024 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका पासून ते जिल्हाधिकारी कार्यलया पर्यंत पायदळ मोर्चा काढण्यात येत असून यात घुग्घूस ते ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांनी शामिल व्हावे असे आवाहन रेड्डी यांनी केले.
0 comments:
Post a Comment