घाटंजी तालुका प्रतिनिधी:-
जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा मंडळ यवतमाळ द्वारा दिनांक 21 जानेवारी ते 23 जानेवारी 2025 पर्यंत नेहरू स्टेडियम गोधनी रोड येथे आयोजित करण्यात आलेली होती. सदर क्रीडा महोत्सव दरम्यान क्रीडा स्पर्धेचा एक भाग म्हणून जलतरण स्पर्धेचा आयोजन जाजू स्कूल यवतमाळ येथे 18 ते 45 या वयोगटात दिनांक 23 जानेवारी 2025 ला सकाळी आठ वाजता आयोजन करण्यात आलेले होते.
Mangesh Gautre won first place in swimming competition
सदर स्पर्धेत मंगेश गाऊत्रे यांनी शंभर मीटर फ्री स्टाइल जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला त्यामुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री पंकज भोयर यांच्या हस्ते मंगेश गाऊत्रे यांचा प्रमाणपत्र आणि चषक देऊन गौरव करण्यात आला
0 comments:
Post a Comment