चंद्रपुर :- सावली पोलिस स्टेशन हद्दीत अवैधरीत्या रेती वाहून नेणाऱ्या तिन ट्रॅक्टरवर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुरने कारवाई करीत ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केले आहे.
3 tractors illegally transporting sand seized
सदरची कारवाई आज दिनांक 25/01/2025 रोजी पोलिस स्टेशन सावली हद्दीत अवैधरीत्या रेती उत्खनन करून ट्रॅक्टर ने वाहतूक सुरू आहे अश्या प्राप्त माहिती वरून पोलिस स्टेशन सावली हद्दीत अवैधरित्या ट्रॅक्टर ने रेती वाहतूक करतांना मिळुन आल्याने त्याचेवर कारवाई करीत 03 ट्रॅक्टर,ट्रॉली सह किमती 12,00,000/-,03 ब्रॉस रेती किमती 15,000/-असा एकूण 12,15,000 रू चा मुद्देमाल जप्त करून अपराध क्रं. 19/2025 कलम 303(2), 223, 3(5) BNS प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.सदरची कार्यवाही मा. श्री. सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक चंद्रपूर, श्रीमती रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्री. महेश कोंडावार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांचे नेतुत्वात
पो हवा. प्रकाश बलकी, सुभाष गोहोकर, पो अं. मिलिंद जांभुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी कारवाई केली
0 comments:
Post a Comment