भद्रावती जावेद शेख:भद्रावती
सध्या तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव बंद आहे त्यामुळे वाळू माफियांनी रेती तस्करीच्या गोरख धंदा सुरू केलेला आहे त्यामुळे
भद्रावती तालुक्यातील रेती तस्करीला उधाण आले आहे तहसीलदार यांनी अवैद्य रेतीवर लगाम लावला परंतु रेती तस्कर प्रशासनाला न जुमानता अवैद्य रेतीची तस्करी चालू आहे
शासनाच्या करोडोच्या महसूल बुडवीत अवैद्य रेती तस्कर दिवस रात्र रेतीच्या उपसा करीत आहे तालुक्यातील अवैद्य रेतीचे ट्रॅक्टर सात ते आठ हजार भावात विक्री करीत आहे त्यामुळे हा आकडा करोडोच्या घरात जाऊन रेती माफिया तस्करी करणारे गब्बर झाले आहे मात्र प्रशासन यांच्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहे ही तस्करी कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हे प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष देण्याचे करावे अशी मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहे तालुक्यातील रेती तस्कर शेतकऱ्यांच्या शेतातून अवैध रीतीचे वाहतूक करीत त्यांच्या पिकांचे नुकसान करीत आहे आधीच शेतकरी हवालदिल झालेला आहे
Smuggling of illegal sand continues in full swing on Parodi Umbar Ghat
However, the administration is pretending to be asleep
0 comments:
Post a Comment