सादिक थैम वरोरा :-
दि. २३/०१/२०२५ रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीवरून पोलिस ठाणे वरोराचे ठाणेदार अजिंक्य तांबडे, सपोनि अनिल मेश्राम, पोउपनि दिपक ठाकरे सोबत पोहवा /२२४४ दिलीप सुर, पो. हवा / २५१५ मोहन निषाद पोअं / १३९९/ मनोज ठाकरे, मपोअं/८८४ तेजस्वीनी गारघाटे सोबत स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील पोलिस ठाणे येथे हजर आलेले पोउपनि/विनोद भुरले, स. फौ./२०६७ स्वामीदास चालेकर, स. फौ./२०४०/धनराज करकाडे, पोहवा / ८११ नितीन कुरेकर, पो. अं/२५७८ प्रशांत नागोसे, पो. अं/१२४७ प्रशांत बदामवार स्टाफासह पंचासमक्ष पंकज टॉकीजमागे, हनुमान वार्ड, वरोरा येथील संघपाल उर्फ संग्राम लभाणे यांचे घरी गांजा रेड केली
Warora Police and Local Crime Branch seize 1 kg 300 grams of ganja after taking strict action against a person selling ganja
असता यातील नमुद आरोपी इसम रसिका संघपाल उर्फ संग्राम लभाणे, वय ३६ वर्षे व फरार आरोपी संघपाल उर्फ संग्राम वासुदेव लभाणे, वय ४६ वर्षे, दोन्ही रा पंकज टॉकीज मागे, हनूमान वार्ड, वरोरा, जि. चंद्रपुर हे स्वतःच्या आर्थीक फायदया करीता मनोव्यापारावर परीणाम करणारे घटक असलेला ओलसर कॅनॉबिस/गांजा वनस्पतीचे पाने फुले व बिया यांची विक्री करण्याकरीता घरी १.३०० किलो ग्रॅम बाळगून असतांना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम (N.D.P.S.Act) १९८५ मधील कलम ८ (क), २० (ब) ii (ब) NDPS कायदया अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संघपाल उर्फ संग्राम वासुदेव लभाने यांस पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला आहे.सदरची कारवाई मा. पोलिस अधिक्षक सा., चंद्रपूर, मा. अप्पर पोलिस अधिक्षक मॅडम चंद्रपूर, मा. नयोमी साटम मॅडम, सहायक पोलिस अधिक्षक तथा पोलिस उपविभागीय अधिकारी, वरोरा यांचे मार्गदर्शनामध्ये पोलिस ठाणे वरोराचे ठाणेदार अजिंक्य तांबडे, सहायक पोलिस निरीक्षक अनिल मेश्राम, पोलिस उपनिरीक्षक दिपक ठाकरे सोबत पोलिस हवालदार दिलीप सुर, मोहन निषाद, पोलिस अंमलदार मनोज ठाकरे, महिला पोलिस अंमलदार तेजस्वीनी गारघाटे सोबत स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील पोलिस उपनिरीक्षक विनोद भुरले, सहायक फौजदार स्वामीदास चालेकर, सहायक फौजदार धनराज करकाडे, पोलिस हवालदार नितीन कुरेकर, पोलिस हवालदार प्रशांत नागोसे, पोलिस अंमलदार प्रशांत बदामवार यांनी केली.
सर्वसामान्य जनतेस आवाहन करण्यात येत आहे की, वरोरा पोलिसांनी अवैध धंदे करणारे धंदेवाईक गुन्हेगार इसम आणि सराईत गुडं इसमाविरुध्द धडक कारवाई मोहीम हाती घेतली असुन, पोलिस स्टेशन हददीत असे गुन्हे करणारे गुन्हेगार इसम दिसुन आल्यास त्वरीत माहीती पोलिस स्टेशन वरोरा फोन कं. ०७७६-२८२०९३ वर किंवा पोलिस नियत्रंण कक्ष येथे १००/११२ कंमाकावर दयावी.
0 comments:
Post a Comment