Ads

खेमजई येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनी दिनदर्शिका प्रकाशन संपन्न

सादिक थैम वरोरा :- तालुक्यातील खेमजई येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायतचे वतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिका 2025 चे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.
Calendar publication on the occasion of Savitribai Phule Jayanti was completed at Khemjai
ग्राम विकासाचे विविध अभिनव व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी खेमजई ग्रामपंचायतीचा नावलौकिक आहे. गेल्या ४ वर्षापासून ग्रामपंचायतीचे पुढाकाराने गावातील प्रत्येक कुटुंबाला वार्षिक दिनदर्शिका तयार करून प्रकाशित केली जाते. सदर दिनदर्शिका करिता ग्रामपंचायतीचा कोणताही खर्च न करता लोक सहभागातून खर्च केला जातो. हीच परंपरा कायम ठेवत सन २०२५ दिनदर्शिका तयार करून दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी समारंभात प्रकाशित करण्यात आली. त्याप्रसंगी वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार करण देवतळे यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. प्रमोद गंपावार होते. प्रा डॉ.संदीप भेले, मुंबई यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. मंचावर आमदार करण देवतळे,आनंद निकेतन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कालभूत, सरपंच मनीषा चौधरी, जिल्हा परिषद चे माजी सभापती कन्हैयालाल जयस्वाल, डॉ.सतीश अघडते, ग्रामसेवक येंचेलवर, आदर्श शिक्षक संजू जांभुळे,अँड.अरविंद पेटकर, अरुण चौधरी, अध्यापक ईश्वर टापरे, धिरज दारुंडे, उपसरपंच चंद्रहास मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत जिल्हा परिषद शाळेच्या मुली स्वागत गीत सादर करून केले. समारंभात डॉ. कालभूत त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. खेळात प्राविण्य प्राप्त पल्लवी सतीश दाते हीचा
आमदार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांनी आपल्या भाषणात खेमजई गावात सुरू असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक करीत भविष्यात एक आदर्श गाव म्हणून वाटचाल करावी यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. डॉ. कालभूत यांनी आपल्या भाषणात खेमजई गावात सन १९९६ यावर्षी झालेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या आठवणी, तत्कालीन गाव व आजचे गाव, ग्रामपंचायत व ग्रामस्थ कार्याचे कौतुक याबाबत अभिनंदन केले. माजी सभापती कन्हैयालाल जयस्वाल यांनी आपल्या भाषणात खेमजई व परिसरात असलेल्या समस्या मांडल्या त्या सोडवण्यासाठी नवनिर्वाचित आमदार देवतळे यांनी प्राधान्याने सोडवाव्या अशी मागणी केली. अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रमोद गंपावर यांनी खेमजई विकासात ग्रामपंचायतचे पदाधिकारी, गावात काम करत असणारे कर्मचारी गुरुदेव सेवा मंडळ, उमेद बचत बचत गट, युवा व ग्रामस्थांची मोलाची भूमिका असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित असलेले नवनिर्वाचित आमदार देवतळे यांना गावाच्या विकासासंबंधी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य रमेश चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन माधुरी निब्रड व शितल साळवे यांनी केले. उपस्थित आमचे आभार ग्राम संघ अध्यक्ष वंदना साळवे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ महिला पुरुष विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment