Ads

मा. सा. कन्नमवार यांच्या रौप्य महोत्सवा निमित्त 10 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूरात..

चंद्रपुर :-10 जानेवारीला प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात आयोजित राज्याचे माजी मुख्यमंत्री, जिल्ह्याचे सुपुत्र स्व. मा. सा. कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार,माजी मंत्री शोभा फडणवीस आणि आमदार कीर्तीकुमार भांगडिया तसेच रौप्य महोत्सव समितीच्या निमंत्रणानंतर ते या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती कर्मवीर मा. सा. कन्नमवार १२५ वी शतकोत्तर रौप्य महोत्सव समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.
Hon. Kannamwar's Silver Jubilee Celebration on 10th January by Chief Minister Devendra Fadnavis in Chandrapur..
मा. सा. कन्नमवार १२५ वी शतकोत्तर रौप्य महोत्सव समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला स्व. मा. सा. कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्याचे स्वागताध्यक्ष किशोर जोरगेवार, मा. सा. कन्नमवार १२५ वी शतकोत्तर रौप्य महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत खणके, उपाध्यक्ष अशोक पुल्लावर, डॉ. सुरेश महाकुलकर, लक्ष्मणराव धोबे, अशोक पुल्लावार, सचिव अवधूत कोटेवार, कार्याध्यक्ष राजेंद्र कन्नमवार, चंद्रपूर जिल्हा बेलदार समाजाचे अध्यक्ष विजय बोरगमवार, मिलिंद बंडिवार, प्रभा चीलके, विजय टोंगे, प्रभाकर पारखी, आदींची उपस्थिती होती.

या पत्रकार परिषदेला संबोधित करताना स्वागताध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, राज्याचे दुसरे मुख्यमंत्री चंद्रपूरचे सुपुत्र मा. सा. कन्नमवार यांच्या जयंती निमित्त शतकोत्तर रौप्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहावी अशी विनंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांची वेळ घेत त्यांना मुंबई येथे सदर कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे यासाठी आपण आग्रही होतो. आता ते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असे त्यांच्याकडून कळविण्यात आले असून महोत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली असल्याचे ते यावेळी म्हणाले.

10 जानेवारीला या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8.30 वाजता लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या पूर्णकृती पुतळ्यास माल्यार्पण करण्यात येणार आहे. तर 9 वाजता वसंत भवन येथून प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. यात शाळकरी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तर 12 वाजता प्रियदर्शनी येथे आयोजित मा. सा. कन्नमवार शतकोत्तर सोहळ्याला सुरुवात होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची विशेष अतिथी म्हणून तर माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थिती राहणार आहे. सोबतच आमदार किशोर जोरगेवार यांची सदर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून मंचावर उपस्थिती राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रतिभा धानोरकर, माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे, चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार नामदेव किरसान, पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजित वंजारी, चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तिकुमार भांगडीया, वरोरा - भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे, माजी मंत्री शोभा फडणवीस, माजी आमदार वामनराव चटप, ग्रामीण विकास संस्थेचे सचिव डॉ. राहुल कन्नमवार आदींची उपस्थिती राहणार आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment