जावेद शेख भद्रावती :- शहरातील जामा मस्जित पासून ते हनुमान नगर, बंगाली कॅम्प ते केसूर्ली गांवाकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. सदर रस्ता हा भद्रावती शहरातील मार्केट मधुन जाती व सामोर फेअरिलॅन्ड स्कुल व कॉन्हेंट आहे. हा रस्ता वस्तीमध्ये जाण्याकरीता नगर परिषद भद्रावतीने तयार केलेला आहे. तसेच जामा मस्जित पासुन ते मटन मार्केट पर्यंत तो रस्ता अरुंद असुन तीथे मार्केट मध्ये येणाऱ्यांची वर्दळ असते तसेच हा रस्ता अवजड वाहतुकी करीता नाही.
Demand to stop heavy traffic on the road from Jama Masjid to Hanuman Nagar to Kesurti village in Bhadavati city
परंतु सदर रस्त्याने मोठ्या प्रमाणात अँश भरुन नेणारे व मुरुम नेणारे हायवा ट्रक क्षमतेपेक्षा अधिक मटेरीअल भरुण जात असतात त्यामुळे सदर रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे त्या कारणाने अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर बाब लक्षात घेता त्या रस्त्याने होणारी अवजड वाहतुक बंद करण्यात यावी मागणी माजी उपनगराध्यक्ष प्रफुल चटकी व माजी नगरसेवक राजीव सारंगधर यांनी निवेदनातून पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन भद्रावती यांना केले आहे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.
0 comments:
Post a Comment