Ads

हद्दपार कार्रवाई नंतरही आरोपींचा शहरात मुक्त संचार

चंद्रपूर :-24 जानेवारी 2024 रोजी चंद्रपूर शहरात शिवा वझरकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला आता एक वर्ष झाले आहे. या खून प्रकरणातील आरोपींना जामीन मिळाला असला तरीही त्यांना शहरात राहण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. असे असूनही आरोपी शहर मुक्तपणे संचार करीत असल्याचा आरोप वझरकर परिवाराने केला आहे त्यामुळे कुटुंबात भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात वझरकर परीवाराने पत्रकार परिषदेद्वारे पोलिस प्रशासनाकडे सुरक्षा आणि न्यायाची मागणी केली आहे.
Even after deportation, the accused moves freely in the city.
पत्रकार परिषदेत शिवा वझरकर यांच्या परिवाराचे न्यायासाठी प्रयत्न सुरू आहे. परंतु आरोपीं द्वारे वारंवार येत असलेल्या धमक्या आणि दबावामुळे कुटुंब नेहमी चिंतेत असल्याची माहीती दिली. जामिनावर शहरात मुक्तपणे फिरणा_या आरोपींना कायद्याची भीती राहिलेली नाही. यावेळी आरोपीं व त्यांचे सहकारी साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपी परीवाराने केला आहे. ब_यांच प्रयत्नांनंतर कुटुंबाने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का लागू करण्याबाबत पोलिस अधीक्षक आणि विशेष पोलिस महानिरीक्षकांना पत्रे पाठवली. या पत्राद्वारे पोलिस प्रशासनाकडे मोक्का कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. परंतु आजपर्यंत मोक्का अंतर्गत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. अशा परिस्थितीत त्यांनी कुटुंबाच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले.
जामिनावर सुटलेले आरोपी त्यांना खटला मागे घेण्यासाठी वारंवार धमकावत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे शिवा वझरकर यांच्या कुटुंबात भीतीचे वातावरण आहे. कुटुंब मानसिक तणावाचा सामना करत आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाकडे मदतीची विनंती केली आहे. आरोपींकडून साक्षीदारांवर दबाव वाढवला जात आहे. कायदेशीर न्याय मिळण्यासाठी प्रशासनाने आरोपींवर त्वरित आणि प्रभावी कारवाई करावी अशी अपेक्षा कुटुंबाने व्यक्त केली आहे.
-----------------------------------
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment