जावेद शेख भद्रावती :-एका 35 वर्षीय इसमाने वर्धा नदीत पाण्यात बुडून आत्महत्या केल्याची घटना दिनांक २ ला तालुक्यातील तेलवासा येथील वर्धा नदी घाटावर घडली. संजय देविदास गोवारदिपे, वय 35 वर्षे, राहणार ढोरवासा असे या मृतक इसमाचे नाव आहे.
35-year-old man commits suicide in Wardha river.
विशेष म्हणजे या इसमाने दोन दिवस अगोदर घरातच तणनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.त्यावेळेस त्याला चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यात तो वाचून नुकताच घरी परतला होता.त्यानंतर त्याने स्वतःला नदीत बुडवून आत्महत्या केली. भद्रावती पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment