Ads

ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल व सनराइज् इंग्लिश प्रायमरी स्कूल मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा.

राजुरा 28 फेब्रुवारी:-
ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल व सनराइज् इंग्लिश प्रायमरी स्कूल येथे मराठी भाषा गौरव दिन सोहळा साजरा करण्यात आला.
Marathi Language Pride Day celebrated at Black Diamond International Pre School and Sunrise English Primary School.
ज्येष्ठ साहित्यिक कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्य विषयी मुलांना माहिती देण्यात आली. यानिमित्ताने मुलांनी मराठीतून कविता म्हणून दाखवल्या आणि गोष्टी सांगितल्या. विविध उपक्रमांच्या माध्यमातून सिंगापूर प्याटर्न वर आधारित शिक्षण या शाळेतून दिले जाते. प्ले स्कुल ते वर्ग एक पर्यंतचे वर्ग या शाळेत असून अगदी लहान मुलं अभ्यासा व्यतिरिक्त रंग, आकार, दिवस, वार, महिने तसेच प्रत्येक संस्कृतीवरील विविध सणसमारंभ प्रत्यक्षपणे उपक्रमाच्या माध्यमातून राबवून त्याविषयीची माहिती अनुभवतात. बालवयातच हसतखेळत व विविध उपक्रमांच्या साह्याने शिक्षण देणारी ही शाळा अल्पावधीतच नावारुपास आली आहे. याकरिता या शाळेचे सल्लागार सदस्य संदीप मालेकर आणि जयश्री मालेकर तसेच केंद्र संचालक ऍड . मनोज काकडे व ब्रँच इंचार्ज शुभांगी धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या सहाय्यक शिक्षिका आलिशा सय्यद, प्रीती सिंग , आयेशा कुरेशी, फिजा शेख , मानसी मॅडम यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम घेण्यात येतात.याकरिता ममता व अर्चना सुषमाताई या मदतनीस चे सहकार्य लाभले . या कार्यक्रमांमध्ये पालकांनी समाधान व्यक्त करीत शाळेमध्ये विविध उपक्रमातून मुलांना शिक्षण दिल्या जाते याबाबत स्तुती केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment