राजुरा :-मौजा चुनाळा येथे सौ. लीलाबाई ईश्वर वडस्कर यांची शेत सर्व्हे नंबर ५ आराजी १.४१ हेक्टर आर. शेतजमीन असून याठिकाणी मोठ्याप्रमाणात ठिबक सिंचनाची व्यवस्था करून नाविन्यपुर्ण पद्धतीने उपक्रमशिल शेतकरी ईश्वर वडस्कर यांनी अनेक वर्षांच्या परिश्रमाने ड्रॅगन फ्रूट, स्टार फ्रूट, राम फळ, लाल व पांढरे चंदन, बांबू, निंबु, सिताफळ, आंबा, सागवान आणि ईतर पालेभाज्या यांची मोठ्याप्रमाणात लागवड केली. राजुरा तालुक्यांतील ड्रॅगन फ्रूट, स्टार फ्रूट घेणारे ते एकमेव शेतकरी. परंतु दि. १५ फेब्रुवारी ला दुपारी ३ वाजताच्या दरम्यान अचानक विद्युत शॉट सर्किटमुळे आग लागल्याने मोठ्याप्रमात शेतपिकांचे आर्थिक नुकसान झाले. यात बांबु , चंदन ,रामफळ, ड्रॅगन फ्रूट, स्टार फ्रूट, सीताफळ, नींबु, सागवान तसेच ठिबक सिंचनाच्या पाईपचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांना घटनेची माहिती मिळताच स्वतः सायकल चालवित राजुरा ते चुनाळा हा प्रवास करीत थेट नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर पोहचले. ईश्वर वडस्कर यांच्याशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
MLA Devrao Bhongale reached directly at the farmers' dam.
लगेच विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकारी व उप विभागीय अभियंता यांच्याशी संपर्क साधून योग्य मौका पंचनामा करून शक्य ती आर्थिक नुकसान भरपाई देण्याचा सूचना आमदार भोंगळे यांनी दिल्या. यावेळी बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था , बाळनाथ वडस्कर, सरपंच, ग्रा.पं. चुनाळा, भाऊराव बोबडे, उपसरपंच, ग्रा. पं. सातरी, विनोद नरेंदृवार, भाजपा नेते, महेश झाडे आदींची उपस्थिती होती.
---------------------------------------------
सायकलीने प्रवास करीत शेतकर्यांच्या बांधावर जाणारे पहिलेच आमदार देवराव भोंगळे.
एरवी आमदार किंवा लोकप्रतिनिधी म्हटल की मोठा फौजफाटा सोबत घेऊन आलिशान गाडीने प्रवास करतांना आपण लोकप्रतीनिधीना बघतो. परंतु आमदार देवराव भोंगळे यांनी सकाळी सायकल स्वारी करीत लोकांच्या समस्या जाणून घेणे, गाठीभेटी घेणे फक्तं शहरातच नाही तर आजूबाजूला असलेल्या ग्रामीण भागात सुद्धा ते चक्क सायकलने प्रवास करतात. सायकलिंग व्यायामा सोबतच सामान्य नागरिकांच्या समस्या, अडचणी समजून घेत त्यावर तात्काळ उपाययोजना करणे, संबंधीत विभागाला तात्काळ भ्रमणध्वनीने संपर्क करून समस्या निकाली काढणे अशी दिवसाची सुरुवात करणारे बहुदा देवराव भोंगळे हे राजुरा विधानसभेचे पहिलेच आमदार म्हनून त्यांची ख्याती सर्वदूर पसरली आहे.
0 comments:
Post a Comment