Ads

'ऑन द स्पॉट' मान्यतेचा धडाका कायम

चंद्रपूर : आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या 'समस्या तुमच्या, पुढाकार आमचा' या उपक्रमाअंतर्गत आज शिक्षणाधिकारी (माध्य.), जि.प. चंद्रपूर यांच्याकडे जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ समस्या निवारण सभा आज मा. सा. कन्नमवार सभागृह, चंद्रपूर येथे पार पडली. यावेळी ३ अनुकंपा व १ उपमुख्याध्यापक पदोन्नती प्रकरणांना 'ऑन द स्पॉट' मान्यतेचे पत्र देण्यात आले. मागील दोन्‍ही सभेत प्रलंबित प्रकरणे रात्री ९ वाजेपर्यंत 'ऑन द स्पॉट' निकाली काढण्यात आली होती. यामुळे आमदार सुधाकर अडबाले यांचा समस्‍या निवारण सभेत 'ऑन द स्पॉट' प्रकरणे निकाली काढण्याचा धडाका कायम असल्‍याने शिक्षकांत आनंदाचे वातावरण आहे.
The explosion of 'on the spot' approval continues
मागील दोन वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची अनेक प्रकरणे प्रलंबित होती. आमदार सुधाकर अडबाले निवडून आल्‍यापासून समस्‍या निवारण सभेच्या माध्यमातून त्‍या निकाली काढण्याचा धडाका लावला. आज पार पडलेल्‍या विषयसूचीतील १०० प्रकरणांपैकी जवळपास ८० टक्‍के प्रकरणे समस्‍या सभा होण्यापूर्वीच निकाली काढण्यात आली.

सभेत अनुकंपा तत्वाअंतर्गत कार्तीक दुधपचारे यांना जनता कन्‍या विद्यालय नागभीड येथे शिपाई सेवक, नित्‍यानंद मोतेवाड यांना कै. अण्णाभाऊ साठे माध्य. व उच्च माध्य. विद्यालय कुंभेझरी येथे प्रयोगशाळा परिचर सेवक, वैष्णवी बंडू भगत हिला आदर्श किसान विद्यालय तथा क. महा. नारंडा येथे कनिष्ठ लिपीक सेवक तर नंदा मुप्‍पीडवार (भवानजीभाई चव्हाण हाय. व क. महा. चंद्रपूर) यांना उपमुख्याध्यापकपदी पदोन्नती पदास 'ऑन द स्पॉट' मान्यतेचे पत्र देण्यात आले. सदर सभा पाच तास चालली.

यावेळी मागील सभेतील इतिवृत्तावर चर्चा करण्यात आली. त्‍यानंतर सामूहिक व वैयक्‍तिक प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. सभेच्या विषयसूचीतील बरीच प्रकरणे निकाली काढण्यात आली. व उर्वरित प्रकरणे १० दिवसांत निकाली काढण्यात यावी, अशा सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी अधिकाऱ्यांना दिल्‍यात.

सभेला शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेश पातळे, उपशिक्षणाधिकारी निकीता ठाकरे, वेतन पथक अधीक्षक श्री. वडेट्टीवार, जगदीश जुनघरी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्‍हाध्यक्ष सुनील शेरकी, जिल्‍हा कार्यवाह दीपक धोपटे, महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, लक्ष्मणराव धोबे, केशवराव ठाकरे, श्रीहरी शेंडे, मारोतराव अतकरे, आनंद चलाख, हेमंतकुमार किंदरले, डॉ. विजय हेलवटे, नितीन जीवतोडे, रुपेश पुरी, प्रज्ञा बारेकर, आसमा खान, अजय विधाते, नंदकिशोर वर्धेलवार, नामदेव ठेंगणे, पाचभाई सर, नाकाडे सर, श्री. निखाडे, अनिल कंठीवार, सतीश मेश्राम व मोठ्या संख्येने जिल्ह्यातील विमाशि संघाचे सदस्‍य, समस्‍याग्रस्‍त शिक्षक उपस्‍थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment