Ads

महाराष्ट्र आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेचे आजपासून संपावर

सादिक थैम वरोरा:- एकत्रित महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना चे कार्यरत आरोग्यमित्र यांचे आज दिनांक 18.02.2025 पासून राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले आहेत.
तरी राज्य आरोग्य हमी सोसायटी (SHAS) व सहाय्य संस्था (TPA) यांनी आरोग्यमित्राच्या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेऊन आरोग्यमित्रांना न्याय द्यावे अशी विनंती पूर्वक निवेदन आरोग्यमित्रांकडून देण्यात आले आहेत. तरी योग्य निर्णय घेण्यात आले नाही. आरोग्यमित्र हे पदविधर असून, योजनेचे योग्य कौशल्य असलेले तसेच रुग्णाचे योग्य समुपदेश करणे. हे सर्व काम आरोग्यमित्र करीत असतो. त्यामुळे दिनांक 23.08.2024 ला जीवनदायी भवन मुंबई येथे झालेल्या बैठकीत सुद्धा सीईओ सर यांनी आश्वासन दिले परंतु त्यावर काही निर्णय घेण्यात आले नाही त्यामुळे आरोग्यमित्र संघटनेकडून पत्रव्यवहार करण्यात आले त्यावर सुद्धा shas व TPA ने काहीच निर्णय घेतले नाही. म्हणून दिनांक 20.01.2025 ला संघटनेकडून संपाची घोषणा 12.02.2025 ला करण्यात आली होती. परतू shas व TPA ने दिनांक 7.02.2025 ला जीवनदायी भवन मुंबई येथे बैठक झाली त्यात सुद्धा 10 दिवसाची वेळ मागण्यात आली ती सुद्धा संघटनेकडून देण्यात आले पण त्यावर 17.02.2025 पर्यंत निर्णय घेण्याची वेळ देण्यात आली त्यावर सुद्धा योग्य निर्णय झालेला नाही त्यामुळे आज दिनांक 18.02.2025 पासून महाराष्ट्र आरोग्यमित्र संघटनेकडून राज्यव्यापी बेमुदत संप चंद्रपूर आरोग्यमित्र कडून सुद्धा चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर संप करण्यात येत आहे. त्यासंपला मार्गदर्शन करण्यासाठी CITU चंद्रपूर जिल्हा संघटनेचे सदस्य कॉ. किशोर जामदार सर, कॉ. राजेश पिंजरकर सर, कॉ. अरुण भेलके सर यांनी मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या उपस्थित आरोग्यमित्र संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालय मान. विनय गौडा जिल्हाधिकारी सर यांना निवेदन देण्यात आले.
तरी आरोग्यमित्र यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात तोपर्यंत हे संप मागे घेणार नाही असे संघटनेचे अध्यक्ष कॉ. डॉ. डी. एल. कराड सर यांच्यावतीने सांगितले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment