Ads

डॉ. प्रशांत मोहिते यांच्या हस्ते बुध्दीबळ स्पर्धेचे शानदार उद्घाटन

चंद्रपुर :26 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवामध्ये गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रशांत मोहिते यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले.
Dr. Prashant Mohite inaugurated the Chess Tournament
याप्रसंगी प्रमुख पाहूणे अधिष्ठाता तसेच राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे, पंच प्रमुख प्रवीण ठाकरे, संतोष शर्मा, डॉ. कुलजीतकौर गिल, प्रा. डॉ. दिनकर हंबर्डे व अश्विन मुसळे उपस्थित होते.
सदर स्पर्धेमध्ये मुलांचे 19 तर मुलींचे 20 संघ सहभागी असून आंतरराष्ट्रीय गुणांक प्राप्त 90 खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा स्विस लिग पद्धतीने फीडे च्या आंतरराष्ट्रीय नियमा नुसार 6 फेऱ्यांमध्ये घेण्यात येणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमाचे संचलन श्री. अश्विन मुसळे यांनी केले,आभार डॉ. अनिष खान यांनी मानले.
पंच म्हणून भी नक्षु सोमवंशी, संजय पाटील, कुमार कनकुम, नरेंद्र कन्नाके, डॉ. नीलकंठ श्रावण यांनी काम पाहिले.
राज्यपाल नियुक्त निरीक्षक तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र. क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा व शारिरीक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ अनिता लोखंडे यांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment