जावेद शेख भद्रावती :-नगरपरिषद भद्रावती महिला व बालकल्याण अंतर्गत महिला बचत गटाचे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2025 तसेच घरघर सविधान व स्वच्छ भारत अभियान 2.0 या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा दिनांक 10 जानेवारी 2025 ला घेण्यात आले होते त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम व घे भरारी कार्यक्रमाचे बक्षीस वितरण कार्यक्रम व सांस्कृतिक महोत्सव दिनांक 15 /2/ 2025 ला घेण्यात आले .
Bhadravati Municipal Council organized a flying sports competition, prize distribution and cultural festival
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय श्री करण भाऊ संजय देवतळे आमदार वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र. तसेच प्रमुख उपस्थिती माननीय सुनीलभाऊ नामोजवार माजी नगराध्यक्ष न.प.भद्रावती तसेच माननीय अनिलभाऊ धानोरकर माजी नगराध्यक्ष न.प.भद्रावती तर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक माननीय डॉक्टर विशाखा शेळकी यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक महोत्सव व घर घर संविधान व स्वच्छ भारत अभियान मिशन अभियानाचे बक्षीस वाटप करण्यात आले त्यात भद्रावती शहरातील एकूण 11 शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेतला होता. व त्या सर्व शाळेनी सहकार्य केल्यामुळे मुख्याध्यापक व प्राचार्य यांच्या मा.आमदार करणभाऊ देवतळे यांच्या शुभहस्ते संविधान बुक व उद्देशिका देऊन सन्मानित करण्यात आले .व सोबतच प्रश्नमंजुषा स्पर्धेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सुद्धा ग्रुप एक प्रथम क्रमांक पावी धनराज बारापात्रे सेंट अनिस हायस्कूल द्वितीय क्रमांक टीना कारेकर सेंट आनेस हायस्कूल तृतीय क्रमांक अनुष्का रवींद्र बदकल श्री साई कान्वेंट तर पाच प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. तसेच ग्रुप दोन मध्ये प्रथम क्रमांक लक्ष्मी बदकल लोकमान्य विद्यालय .द्वितीय क्रमांक श्रावणी लाखे ओ एफ हायस्कूल. तृतीय क्रमांक दानिश कुराडे ओ.एफ.हायस्कूल व दोन प्रोत्साहन पर बक्षीस. ग्रुप तीन मध्ये प्रथम क्रमांक सागर विलास सातपुते लोकमान्य जुनियर कॉलेज .द्वितीय क्रमांक मनोज प्रमोद बावणे लोकमान्य जुनिअर कॉलेज. तृतीय क्रमांक पियुष चहांदे झेडपी ज्युनिअर कॉलेज व सोबत दोन प्रोत्साहन पर बक्षीस .माननीय आमदार करणभाऊ देवतळे. व माननीय सुनील भाऊ नामोजवार माजी नगराध्यक्ष. तसेच माननीय अनिल भाऊ धानोरकर माजी नगराध्यक्ष. ह्या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले . व शेवटी सांस्कृतिक स्पर्धेचे सुद्धा बक्षीस वितरण माननीय डॉक्टर विशाखा शेळकी मुख्याधिकारी तथा प्रशासक यांचे हस्ते प्रदान करण्यात आले .सदर कार्यक्रमाला भद्रावती शहरातील पत्रकार बंधू,नागरिक. महिला. विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य ,शिक्षक ,तसेच ज्येष्ठ नागरिक, सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमाला नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केले आहे
0 comments:
Post a Comment