चंद्रपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खासदार प्रफुल पटेल साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी रुग्णांच्या डोळ्याची तपासणी करीत ११३ गरजू रुग्णांना मोफत चष्मे आणि औषध वाटप केले.
Free spectacles distributed to 113 citizens on the occasion of the birthday of Hon. Praful Patel
आज झालेल्या कार्यक्रमात डोळे तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी उपस्थित रुग्णांना डोळ्याची काळजी घेणे बाबत योग्य मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, माजी सरपंच अमोल ठाकरे, युवक शहर अध्यक्ष अभिनव देशपांडे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, कामगार विभाग जिल्हाध्यक्ष संजय शेजुळ, वैद्यकीय विभाग जिल्हाध्यक्ष पंकज ढेंगारे, ग्रामपंचायत सदस्य अनुकुल खन्नाडे, अनिकेत सुखदेवे, प्रशांत वानखेडे, संदीप सुखदेवे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अनिकेत सुखदेवे, रुकेश गेडाम, प्रशांत वानखेडे, इम्रान अली, संदीप सुखदेवे, मिलिंद जगदाळे, विशाल शेंडे, अनिकेत आदे, अमित कांबळे, वैभव आगलावे, प्रविण गोंगले, सुहास दहेगावकर, जिवन दहेगावकर, निरज रामटेके, ज्योती वानखेडे, सुनिता भजभुजे, अनुराधा साव, स्नेहा दुधकुरे, सुनिता कमलवार यांनी परिश्रम घेतले.
0 comments:
Post a Comment