सादिक थैम वरोरा :-स्पोर्टस फाउंडेशन वरोरा (WSF ) व लोकशिक्षण संस्था वरोडा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित लोकमान्य महाविद्यालयाच्या मैदानावर संपन्न होणाऱ्या स्व. खा बाळूभाऊ धानोरकर स्मृतिप्रत्यर्थ खासदार चषक अखिल भारतीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन मंगळवार दिनांक 18 ला महाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडा मंत्री सुनील केदार यांचे हस्ते संपन्न होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रतिभा बाळूभाऊ धानोरकर, खासदार चंद्रपूर वणी लोकसभा क्षेत्र या असणार आहे.
स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार शामकुमार बर्वे ,चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, वरोरा चे उपविभागीय अधिकारी झेनित चंद्रा, उपविभागीय पोलीस अधिकारी नवोमी साटम , तहसीलदार योगेश कोटकर ,मुख्याधिकारी आशिष बोबडे, सवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर. वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रफुल खुजे,जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, तर प्रमुख उपस्थिती म्हणून लक्ष्मण गमे, सर्वाधिकारी गुरुदेव सेवा मंडळ मोझरी , आहेतश्याम अली, माजी नगराध्यक्ष, निरज गोटी, अध्यक्ष, भारत शिक्षण संस्था ,सौ सुवर्णरेखा पाटील सदस्य, लोक शिक्षण संस्था वरोडा, अभय टोंगे , ऍड. गजानन बोडाले, बंडोजी देऊळकर, गणेश पावडे ,डॉ. जयश्री शास्त्री ,सौ सुनीता काकडे हे उपस्थित राहणार असून या स्पर्धेत भारतातील नामवंत पुरुषाचे संघ सहभागी होत आहे. इंडियन नेव्ही, साउथ सेंट्रल रेल्वे, सिकंदराबाद ,नॉर्दन
रेल्वे दिल्ली, एसआरएम युनिव्हर्सिटी चेन्नई, अग्नी फ्रेंड्स क्लब चेन्नई, डेंजर बॉईज तामिळनाडू, बीएसएफ जालंधर ,एलएनआयपी युनिव्हर्सिटी ग्वाल्हेर सहित महाराष्ट्रातील नामवंत संघ सहभागी होत असून महिला विभागात साउथ सेंट्रल सिकंदराबाद ,सेंट्रल रेल्वे मुंबई ,केरला पोलीस , पूर्व रेल्वे कोलकत्ता, एसआरएम युनिव्हर्सिटी चेन्नई, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया त्रिवेंद्रम, महाराष्ट्र बँक पुणे हे संघ सहभागी होणार असून यानिमित्ताने वरोरा शहरातील व्हॉलीबॉल प्रेमींना अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडूंचा खेळ बघावयास मिळायची नामी संधी असून खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या स्पर्धा यशस्वी करण्याकरिता आयोजन समितीचे अध्यक्ष मानस धानोरकर, लोकशिक्षण संस्था वरोडा व वरोरा स्पोर्टस फाउंडेशन वरोरा यांचे पदाधिकारी अहोरात्र परिश्रम घेत आहे
0 comments:
Post a Comment