राजुरा:- स्टेला मॅरिस काॅन्वेंट स्कुल बामणवाडा च्या खेळाडूंनी चंद्रपूर जिल्ह्या ॲथलेटिक्स संघटना चंद्रपूर च्या वतीने शारीरिक शिक्षण महा. विसापूर येथे घेण्यात आलेल्या ८, १०, १२, १४ वर्षाखालील मुला, मुलींच्या मैदानी स्पर्धेत भाग घेतला व घवघवीत यश संपादन केले.
१० वर्षाखालील वयोगटात कु. प्रज्वल मोरे स्पाॅट जम्प मध्ये प्रथम, कु. प्रणय डाहूले ५०मी व १००मी धावने मध्ये द्वितीय, कु. अस्मिता मकाला ५०मी मध्ये तृतीय, १००मी मध्ये द्वितीय, कु. आरोही मडावी स्पाॅट जम्प व गोळा फेक मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
१२ वर्षाखालील वयोगटात कु. ओम पिंपळकर लांब उडी मध्ये द्वितीय, कु. आयुषी चव्हाण गोळा फेक प्रथम, ६०मी धावन्या मध्ये तृतीय क्रमांक पटकावला. १४ वर्षाखालील वयोगटात कु. चरित्रा पवार गोळा फेक मध्ये तृतीय, कु. अश्मी मडावी गोळा फेक मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
या सर्व खेळाडूंची २३ ते २४ फेब्रुवारी रोजी कर्मवीर भाऊराव पाटील काॅलेज, पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरिय सब-ज्युनियर मैदानी स्पर्धेकरिता निवड झाली. या खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. भास्कर फरकाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जाॅयल डि एम् , सिस्टर आल्फी डि एम् चंद्रपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष श्री दिलीप जयस्वाल, सचिव श्री सुरेश अडपेवार, तालुका संयोजक श्री हरिचंद्र विरुटकर, श्री बादल बेले, श्री किशोर चिंचोळकर, कु. पुर्वा खेरकर, भार्गवी कोडाली, मयूर खेरकर, हर्षल शिरसागर व शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.
0 comments:
Post a Comment