Ads

अवैध रेती वाहतूकीचा ट्रक पकडला, २२.२० लाखा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर :-illegal sand १४ फेब्रुवारी २०२४ रोजी विरूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकचालक आणि मालकावर कारवाई करत एकूण २२,२०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष मोहिमेचा भाग असून, गेल्या आठवडाभरात पोलिसांनी वाळू तस्करांविरोधात कठोर पावले उचलली आहेत
Truck caught transporting illegal sand, goods worth Rs 22.20 lakh seized
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला विरूर पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतुकीची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पथकाने कारवाई केली. संशयित ट्रक अडवून तपासणी केली असता, कोणतेही अधिकृत परवाने नसताना मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक केली जात असल्याचे आढळले. त्यानंतर सदर ट्रक जप्त करण्यात आला आणि दोघा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

१) प्रफुल श्यामराव गेडेकर, वय 33 वर्ष, धंदा-चालक, रा. नगराला ता.जिवती जी.चंद्रपुर,
२) आनंद माधवराव ढगे, वय- ४०वर्ष, धंदा-मालक, रा. कोरपना जी.चंद्रपुर,
या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.यांचेवर पो. स्टे. विरूर येथे अप क. १५/२५ कलम ३०३ (२) भा. न्या. स. सहकलम १७७ मो. वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करून ट्रक चालक यास पुढील कार्यवहीकामी पो.स्टे. विरूर यांचे ताब्यात देण्यात आले.

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून, यामध्ये पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंभोरकर, पोहवा जयंता चुनारकर, नापोशी संतोष येलपुलवार, पोशी गोपाल अटकुलवार, प्रमोद कोटनाके, मिलिंद जांभुळे, गणेश भोयर (स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment