Ads

भारत-न्युझीलँड अंतिम सामन्यावर हॉटेल व्यंकटेश येथे क्रिकेट सट्टा घेणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या जाळ्यात

चंद्रपुर :-भारत-न्यूझीलंड दरम्यान क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने व्यंकटेश हॉटेल
मध्ये पकडले. या कारवाईत तीन मोबाइल संच, टी व्ही व सट्टा घेण्यासाठी इतर साहित्य असा १,७६,७००/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
Accused of taking cricket bets at Hotel Venkatesh on India-New Zealand final caught by Local Crime Branch, Chandrapur
दिनांक ९ मार्च, २०२५ रोजी गोपनिय माहितीवरुन पो.स्टे. चंद्रपूर शहर ह‌द्दीतील कस्तुरबा रोडवरील हॉटेल व्यंकटेश (फ्रेन्ड बॉर अॅण्ड रेस्टॉरंट, नायडु चेंबर) या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने छापा टाकला असता (१) पारस दादाराव उखाडे (२) अविनाश नारायण हांडे, (३) राकेश अरुण कोंडावार सर्व रा. चंद्रपुर हे हॉटेलच्या एका रुम मध्ये भारत-न्युझीलँड क्रिकेट सामन्यावर allpanelexch.com, nice7777.fun a nice.45-tech या ऑनलाईन बेटींगOnline Betting आय डी पुरविणारे साईटवर बेटींग करत असतांना मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन पाच नग मोबाईल किं १२५०००/-, रोख रक्कम २६७००/- रु., टीव्ही व इतर साहित्य किं. २५०००/- असा एकुण १,७६,७००/-रुपयाचा मु‌द्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीविरुध्द पोस्टे चंद्रपूर शहर येथे अप. क. १७०/२०२५ कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम, सहकलम ४९ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्राथमिक तपासात वरील आरोपी हे यापुर्वी सुध्दा ऑनलाईन क्रिकेट बेंटीगचे गुन्हयातील आरोपी असुन ते ऑनलाईन क्रिकेट बेंटीग करिता विविध लोकांना आय डी पासवर्ड देत असुन बेटींगचे पैश्याचे देवाणघेवाणकामी एकुण ३८ वेगवेगळे बॅकेचे खाते वापरत असल्याचे दिसुन आले आहे, त्यापैकी काही खाते हे परराज्यातील आहेत, हे सर्व खाते पोलीसांनी तपासादरम्यान फ्रिज केले असुन त्यामध्ये आतापर्यत एकुण जवळपास ६० लक्ष रुपयापर्यतची रक्कम फ्रिज केली आहे. काही आंतरराष्ट्रीय क्रमांकावरसुध्दा आरोपी यांचे ऑनलाईन क्रिकेट बेंटीगसंबधाने चॅटींग असल्याचे दिसुन येत असुन लाखो रुपयाचा व्यवहार चॅटींगमध्ये दिसुन येत आहे. सायबर पोलीस स्टेशन यांचे मदतिने आरोपीचे मोबाईल फोनची तपासणी सुरु असुन आतापर्यत चंद्रपुर, नागपुर, यवतमाळ, गडचिरोली व इतर शहरातील विविध इसम हे वरील आरोपी यांचेकडे ऑनलाईन बेटींग करित असल्याचे तपासात दिसुन येत आहे.
allpanelexch.com, nice7777.fun a nice.45-tech या ऑनलाईन बेटींग साइट बनवणारे व आरोपी इसमांना पुरविणारे इसमाबाबत पुढिल तपास पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री अमोल काचोरे, यांचे मार्गदर्शनात सपोनी बलराम झाडोकार, स्थानीक गुन्हे शाखा हे करित आहेत.Online Cricket Betting

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात श्री अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांचे नेतृत्वात सपोनि श्री बलराम झाडोकार, पोउपनि श्री संतोष निंभोरकर, पोहवा गणेश मोहुर्ले, पोना संतोष येलपुलवार, पोअं नितीन रायपुरे, अमोल सावे, मिलींद जांभुळे यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment