Ads

गोवंश तस्करांवर मूल पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’!

मूल नासिर खान: गोवंशाची अमानुष व अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात मूल पोलिसांनी धडक कारवाई करत मोठी कारवाई केली. मौजा बेंबाळ चौकीसमोरील रस्त्यावर नाकाबंदी करून पोलिसांनी २४ गोवंश जनावरांची सुटका केली असून, ८ बोलेरो पिकअप वाहनांसह एकूण ४५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.Mul police conduct 'surgical strike' on cow smugglers!
दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता मूल पोलिसांना गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे बेंबाळ चौकीसमोरील रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली. यावेळी एकापाठोपाठ ८ बोलेरो पिकअप वाहने पोलिसांच्या हाती लागली.
या वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता, अमानुषपणे व वेदना होईल अशा पद्धतीने २४ गोवंश जनावरांची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. ही जनावरे कत्तल व विक्रीच्या उद्देशाने नेली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
कारवाईदरम्यान ५ लाख ५५ हजार रुपये किमतीचे २४ गोवंश बैल तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ४० लाख रुपये किमतीची ८ पिकअप वाहने जप्त करण्यात आली. अशाप्रकारे पोलिसांनी एकूण ४५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी महेश देवीदास फटींग (३७), रा. कुंझा; किशोर सेवक नागपुरे (३८), रा. बोंडेगाव; विक्की धनपाल देशमुख (२८), रा. वेडवा; अंकुश देवराव मेंढुले (४८), रा. पवनी; दिपक यादव चुनरी (४२), रा. व्याहाड खुर्द; दिपक योगराज कांबळे (२५), रा. किटाळी; दिगंबर मंगरू मुनघाटे (३६), रा. आंबेशिवणी; आणि राहुल मोरेश्वर चौधरी (३६), रा. चकपिरंजी यांच्याविरुद्ध मूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम २०१५ चे कलम ५(क), ९ तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम १९६० चे कलम ११(१)(डी)(एच) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोहवा/१७०३ इदल राठोड करीत आहेत.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
कारवाईत सपोनि सुरेश कन्नाके, पोउपनि रूपेश कुंभरे, पोउपनि उमेश पिपरे, पोउपनि व्यंकटेश दोनोंडे, पोहवा इदल राठोड, पोहवा सुनिल कुळमेथे, पोअं दिलीप आदे, नरेंद्र वाकडे, प्रकाश चिकराम, शंकर बोरसरे आणि प्रमोद सावलसाकडे यांनी सहभाग घेतला.
मूल पोलिसांच्या धडक कारवाईमुळे गोवंश तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, अवैध वाहतुकीविरोधात पोलिसांनी कडक पवित्रा घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment