Ads

पोलिसांच्या मनगटावर बहिणीच्या प्रेमाची राखी; कल्पना पोतर्लावार यांच्या नेतृत्वात रक्षाबंधन सोहळा

बल्लारशाह : महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने मनसे महिला सेना तालुकाध्यक्षा सौ. कल्पना पोतर्लावार यांच्या नेतृत्वाखाली बल्लारशाह पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.Rakhi of sister's love on policeman's wrist; Raksha Bandhan ceremony led by Kalpana Potarlawar

यावेळी बल्लारशाह पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार  तसेच पोलीस बांधवांना मनसे महिला सेनेच्या वतीने राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

पोलीस बांधव दिवस-रात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच शहरातील वाढती गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचार यावर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

महिलांच्या सन्मान व सुरक्षेसाठी मनसे महिला सेना सदैव आक्रमकपणे आवाज उठवत राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमास समाजकार्यकर्ता प्रगती भोसले, तथा मनसैनिक संगीता दुर्गे, लता कालेपेल्ली, साक्षी खोब्रागडे, ज्योती दुर्गे, रजनी पाझरे, प्रभा गडगटे, मंगला खोब्रागडे, ज्योती यादव, सुनिता दुर्गे, मनीषा सोनी, पिंकी गडगटे, अलका दुर्गे, संजना पाझरे, सपना सोनपीपरे, नेहा, अश्विनी शेंडे, जया पाटलावार उपस्थित होत्या.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment