Ads

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी भद्रावती येथे बौद्ध समाज संघटनेचा मोर्चा.

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :-
देशातील बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचे जागतिक स्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचे पवित्र स्थान असल्याने त्याच्याशी बौद्ध समाजाच्या भावना जुळलेल्या आहेत.
Buddhist community organization marches in Bhadravati for the liberation of Mahabodhi Mahavihara.
त्यामुळे टेम्पल अॅक्ट 1949 रद्द करून सदर महाबोधी महाविहार बौद्धांच्या स्वाधीन करण्यात यावे यासाठी मोर्चाचे मार्गदर्शक म्हणते ज्ञानज्योती महाथेरो, भंते सच्चक हेरो, भिकुनी सुबोधी, व जिल्ह्यातील भिकू संघ, बौद्ध समाज संघटना भद्रावती तर्फे दिनांक 21 रोज सोमवारला सकाळी 11 वाजता स्थानिक विजासन बुद्ध लेणी प्रवेशद्वारापासून तहसील कार्यालयापर्यंत एक विशाल मोर्चा काढून आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपतींना सादर करण्यात आले. 1949 मध्ये बौद्धगया टेम्पल अॅक्ट निर्माण करून व्यवस्थापन समितीत चार बौद्ध प्रतिनिधी,चार हिंदू प्रतिनिधी व जिल्हाधिकारी असतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.त्यामुळे बौद्ध बांधवांची कायम अनास्था झाली आहे. त्यामुळे बौद्ध समाजाच्या भावना लक्षात घेऊन सदर महाविहार पूर्णतः बौद्ध प्रतिनिधींच्या व्यवस्थापन समितीकडे सोपविण्यात यावे अशी मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे. सदर मोर्च्यात शहरातील बौद्ध बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment