Ads

रामनगर गुन्हे शोध पथकाने सेंट्रीग प्लेट चोरी करणा-या चोरटयाला केले अटक

चंद्रपुर :-चंद्रपूरः पो.स्टे. रामनगर गुन्हे शोध पथकाने सेंट्रींग प्लेट चोरी करणाऱ्या चोरट्याला घुटकाला वार्ड येथून केली अटक
Ramnagar Crime Investigation Team arrested a thief who stole a centring plate
दिनांक १४/०४/२०२५ रोजी पोस्टे रामनगर येथे दाखल अप क ३०६/२०२५ कलम ३०३(२) बि. एन.एस. मधील फिर्यादी निर्मल नर्कतचंद्र भंडारी वय ४५ वर्ष धंदा ठेकेदारी रा. जामा मस्जिद समाधी वार्ड चंद्रलोक बिछायत केंद्र चंद्रपुर. हे दि. १४/०४/२०२५ रोजी पोलीस स्टेशन रामनगर येथे येवुन रिपोर्ट दिली की, दिनांक ०५/०४/२०२५ रोजी मकरंद लॉन जवळ घर बांधकामाचा ठेका चालु असल्याने फिर्यादी यांनी तिथे कामा करीता १९ नग सेंट्रीग प्लेट प्रत्येकी कि.अं. ४,०००/- रू ठेवले होते. व दिनांक १३/०४/२०२५ रोजी सकाळी ०८:३० वा. दरम्यान फिर्यादीने बाधकामाच्या जागेवर जावुन पाहिले असता त्यांना तिथे ठेवलेल्या सेट्रींग प्लेटा दिसुन आल्या नाही कोणी तरी अज्ञात चोरानी त्यांचे १९ नग सेट्रींग प्लेट प्रत्येकी ४,०००/- रू असा एकुण ७६,०००/- रू चा माल कोणी तरी अज्ञात चोरानी चोरून नेले अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवुन मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपूर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव सा. चंद्रपूर, वरिष्ठ पालीस निरीक्षक आशीफराजा शेख पोस्टे रामनगर यांनी स्वतः गुन्हेशोध पथका सह तात्काळ घटनास्थळावर रवाना होवुन आरोपी शोध घेण्याबाबत मार्गदर्शन केले. गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी तांत्रीक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्यपुर्ण तपास करून आरोपी नामे हर्षद उर्फ सेक्सी कालीदास मेश्राम वय २६ वर्ष धंदा मजुरी रा. घुटकाला वार्ड नेहरू स्कुलजवळ मुरसकर यांचे घरी किरायाने यास दिनांक १५/०४/२०२५ रोजी ताब्यात घेवुन विचारपुस केले असता आरोपीतांनी सदर गुन्हयातील चोरी केलेल्या १९ नग सेट्रींग प्लेट प्रत्येकी ४,०००/- रू असा एकुण ७६,०००/- रू चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपूर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव सा. यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसीफराजा शेख, तसेच गुन्हे शोध पथक रामनगर चे सपोनी देवाजी नरोटे, सपोनी हनुमान उगले, पोहवा/०९ पेत्रस सिडाम, पोहवा /२२७३ शरद कुडे, पोहवा /१४४६ सचिन गुरनुले, पोहवा / ११६५ आनंद खरात, पोहवा / २४५४ प्रशांत शेंद्रे, पोहवा / २४३० लालु यादव, मपोहवा/४६२ मनिषा मोरे, पोशि/८८१ संदीप कामडी, पोशि / ८२५ हिरालाल गुप्ता, पोशि / ७८७ रविकुमार ढेंगळे, पोशि / ६३० प्रफुल पुप्पलवार, पोशि १२३०/ पंकज ठोंबरे, मपोशी ब्लुटी साखरे/२६५३ यांनी कार्यवाही केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment