Ads

बोगस डाक्टरच्या निष्काळजीपणामुळेच मुलीचा मृत्यू

चंद्रपूर :-वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे बोगस डॉक्टर रूद्र रॉबीन मंडल हे कोणत्याही शैक्षणिक पदवी किंवा डिप्लोमाशिवाय महाकाली क्लिनिक चालवत आहे. डॉक्टरच्या निष्काळजीपणा आणि बेजबाबदार कार्यामुळे 11 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
Girl dies due to negligence of bogus doctor
या संदर्भात मुलीच्या पालकांनी पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासनाला तक्रार करूनही डाक्टर व धनंजय मेडीकल चे संचालक वर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने मृत मुलीची आई शिला नाईक आणि वडील मोरेश्वर नाईक यांनी पत्रकार परिषदेद्वारे डॉक्टर आणि मेडकील संचालका वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास जिलाधिकारी कार्यालय समोर आरोग्य विभागाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे.
मुलीचे वडील मोरेश्वर नाईक यांनी सांगितले की, त्यांच्या 11 वर्षांच्या समता नावाच्या मुलीची प्रकृती 30 जुलै 2024 रोजी अचानक बिघडली. तिला उपचारासाठी वरोरा तहसीलमधील खांबाडा येथील डॉ. रूद्र रॉबीन मंडल, महाकाली क्लिनिक येथे नेण्यात आले. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली आणि तिला रक्त तपासणीसाठी खांबाडा येथील प्रयोगशाळेत पाठवले. जेव्हा चाचणीचा अहवाल डॉक्टरांना दाखवण्यात आला तेव्हा त्याला काही गोळ्या देऊन घरी पाठवण्यात आले. दुस_यां दिवशी डॉक्टरांनी मोरेश्वर नाईक ला फोन करून पुन्हा रुग्णालयात बोलावले. डॉक्टरांनी मुलीला 100 मिली सलाईनमध्ये तीन इंजेक्शन देऊन चढविण्यात आले. काही वेळानंबर तीला डिस्चार्ज देण्यात आला. घरी पोहोचल्यानंतर अर्ध्या तासाने, मुलीचे शरीर थंडीमुळे थरथर कापू लागले. मुलीची तब्येत आणखी बिघडली. सलाईनमुळे मुलगी अशक्त होऊ लागली. मुलीची अवस्था पाहून पालक काळजीत पडले. त्यांनी डाक्टर मंडल कडे नेल्यावर घरगुती उपाय करून पाहिले आणि मुलीच्या शरीरावर थंड पाणी शिंपडले आणि को_या कागदावर तिला काही औषधे लिहुन दिली. पण मुलगी औषधे घेण्याच्या स्थितीत नव्हती. त्यानंतर मुलगी बेशुद्ध झाली. मुलीची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी तिला दुस_यां रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. मुलीच्या वडिलांनी तिला ताबडतोब हिंगणाघाट येथील एका चांगल्या डॉक्टरकडे नेले. संबंधित डॉक्टरांनी मुलीची प्रकृती अधिक गंभीर असल्याने तिला सरकारी रुग्णालयात रेफर करण्यास सांगितले. सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी अल्पवयीन मुलगी समता हिला मृत घोषित केले.
वडील मोरेश्वर नाईक आणि शिला नाईक यांनी खांबाडा चे डाक्टर मंडल यांच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कामामुळे आणि धनंजय मेडिकल स्टोअरचे संचालक यांनी बोगस डाक्टर च्या प्रिस्क्पीप्शन वरून औषधी दिल्यामुळे मुलीचा मृत्यु झाला. या संदर्भात डॉक्टर आणि मेडीकल संचालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रशासनास केली आहे. कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य विभागाविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा मोरेश्वर नाईक आणि शिला नाईक यांनी दिला आहे.
-----------------------------------
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment