भद्रावती प्रतिनिधी जावेद शेख:-
भद्रावती तालुक्यातील निलाव बंद असल्याने रेती तस्कर रेतीच्या अवैध्य साठा जमा करून ठेवलेला आहे त्यामुळेअवैद्य रेतीला उधाण आले आहे या प्रकाराला आळा घालण्यासाठी तहसीलदार राजेश भांडारकर यांचे नेतृत्वात गौण खनिज पथक यांनी मोहीम सुरू केली आहे
Unauthorized sand stockpile seized in Chandankheda
त्याअंतर्गत गौण खनिज पथकाद्वारे कारवाईचे सत्र सुरू आहे आज दिनांक 21.4.2025 रोजी सकाळी 8,20 सर्वे नंबर 171, वसंत डोमाशास्त्रकार यांचे शेतात या ठिकाणी रे ती साठा जप्त करण्यात आले दहा वाजता मौजाचंदनखेडा येथे साई नगरी लेआउट येथील प्लॉट क्रमांक 44 व प्लॉट क्रमांक 45प्लॉटवर सदर ठिकाणी अवैद्य रेतीच्या साठा आढळून आलेला व अन्य एका ठिकाणी मुबलक प्रमाणात अवैध रेती साठा आढळून आलेला आहे एकूण 86 ब्रास अवैध रेतीच्या साठा भद्रावती महसूल गौण खनिज पथक यांनी जप्त करून सदर रेतीसाठा ची तपासणी केली असता विविध ठिकाणी अवैद्य रेती साठाआढळून मिळाला,मोका तपासणी केली असता सदर रेतीसाठा पंचनामा करून पोलीस पाटील श्री समीर खान पठाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले सदरची कारवाई गौण खनिज पथक मंडळ अधिकारी जयश्री गणपुरकर तलाठी खुशाल मस्के, तलाठी संदेश सरफे, गोविंदा सेलोटे, अनिल शृंगारेयांनी केली असून महसूल विभाग यांच्यावर कोणती कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष आहे
0 comments:
Post a Comment