भद्रावती :-शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल कुणबी महासंघ चंद्रपूर जिल्हा शाखेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, शेतकऱ्यांना हमीभाव देण्यात यावा, कुणबी समाजाच्या हितार्थ कुणबी महामंडळाची स्थापना करण्यात यावी, ओबीसींना आरक्षणाच्या प्रतवारी शिक्षण, नोकरी, राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिनिधित्व द्यावे. शासकीय प्राथमिक शाळा बंद न करता त्या पूर्ववत चालू ठेवाव्यात. सर्व क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, ओबीसी नॉन क्रिमिनलची अट रद्द करावी अशा मागण्या सदर निवेदनातून करण्यात आलेल्या आहेत. निवेदन सादर करताना अखिल कुणबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. के. आरीकर यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अतुल ठाकरे, चंद्रपूर उपजिल्हाध्यक्ष अतुल कोल्हे, जिल्हा कार्याध्यक्ष सुधीर कोरडे, देवेंद्र बट्टे, महिला जिल्हाध्यक्ष सौ विद्या चिताडे, सौ वर्षा कालभूत जिल्हा सचिव, जिल्हा उपाध्यक्ष संजय फाले, युवा महाराष्ट्र अध्यक्ष आशिष येडांगे, चंद्रपूर यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख नूतन लेडांगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अखिल कुणबी महासंघाचे मनोज मंदे वरोरा भद्रावती विधानसभा संघटक, सदस्य प्रकाश चिताळे अकतर अली, अजय यलोडे, महेंद्र शेरकी हे उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment