Ads

रस्ता अडवुन खिशातील नगदी व मोबाईल फोन जबरीने हिसकावुन लुटमार करणारे दोन गुन्हेगारांन काही तासातच पोलीसांनी केली अटक

चंद्रपुर :-दिनांक २१ एप्रिल, २०२५ रोजी यातील फिर्यादी हा त्याचे मैत्रीन सह आनंदवन चौक वरोरा ते शेगांव रोड लगत आयटीआय जवळुन जात असतांना अनोळखी दोन इसमांनी लाल रंगाच्या पेंशन प्रो मोटार सायकलने येवुन त्यांना अडवुन १०,०००/- रुपयाची मागणी करुन फिर्यादीच्या खिशातील व त्यांच्या मैत्रीनीच्या हातातील मोबाईल फोन हिसकावुन जबरी चोरी करुन धमकी देवुन पळुन गेल्याचे रिपोर्टवरुन पोस्टे वरोरा येथे अपराध क्रमांक २८०/२०२५ कलम ३०९ (४), ३०४ (३), १२६ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
Police arrested two criminals within hours who blocked the road and robbed people of their cash and mobile phones.
पोलीस स्टेशन वरोरा येथील गुन्हे शोध पथकाने तात्काळ गुन्हयातील आरोपींचा शोध घेवुन आरोपी नामे अक्षय मोहन सहारे वय ३५ वर्ष आणि आकाश उर्फ गोलु वाल्मीक पाझारे वय ३२ वर्ष दोन्ही रा. वरोरा यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन चोरी केलेले मोबाईल, नगदी व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल क्रमांक MH34X-0441 असा एकुण १,१०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, नयोमी साटम, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांचे मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी पो.स्टे. वरोरा, गुन्हे शोध पथक प्रभारी पोउपनि श्री दिपक ठाकरे, पोहवा दिलीप सुर, मोहन निशाद, अमोल नवघरे, मनोज ठाकरे, महेश गावतुरे, विशाल राजुरकर, संदीप मुळे, संदीप वैद्य सर्व पोस्टे वरोरा तसेच सपोनि श्री बलराम झाडोकर स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोस्टे यांनी केली आहे.च
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment