Ads

लाभार्थ्यांपर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या योजना पोहोचवा

चंद्रपूर : जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजेत, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवा भावनेने काम करावे, अशा सूचना बल्लारपूर व गोंडपिपरी येथे झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिल्या.
Reach out to the beneficiaries with Central and State Government schemes*
"जनता व सरकार यांच्यातील दुवा म्हणजे प्रशासन. कार्यालयात आलेला प्रत्येक लाभार्थी समाधानाने परत गेला पाहिजे, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे," असे सांगत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या बजावण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

गोंडपिपरी येथे उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, तहसीलदार बाहेकर, पोलीस निरीक्षक हत्ती गोटे, गटविकास अधिकारी चनफने , नगरपंचायत नगराध्यक्ष कुळमेथे, काँग्रेस जेष्ठ नेते अरुण धोटे, काँग्रेस तालुका अध्यक्ष देवीदास सातपुते, महिला तालुका अध्यक्ष सोनी दिवसे, काँग्रेस माजी तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे, जेष्ठ काँग्रेस नेते देविदास बट्टे, विपीन पेद्दीलवार, राजू झाडे, गौतम झाडे, अशोक रेचनकार, संतोष बंडावार, अनिल कोरडे, तसेच अनेक गावातील सरपंच, ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

बल्लारपूर येथील आढावा बैठकीत उपविभागीय अधिकारी अजय चरडे, नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वाघ, गटविकास अधिकारी साळवे, पोलीस निरीक्षक शाम गव्हाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मेंढे, अप्पर तहसीलदार रेणुका कोकाटे, प्रभारी तहसीलदार फुलझले, काँग्रेस जेष्ठ नेत्या रजनीताई हजारे, काँग्रेस जेष्ठ नेते घनःशाम मुलचंदानी, तालुका अध्यक्ष गोविंदा उपरे, काँग्रेस नेते भास्कर माकोडे, देवेंद्र आर्य, काँग्रेस महिला नेत्या छाया मडावी, अफसाना सय्यद, सुभाष ताजने, प्रीतम पाटील, प्रदीप गेडाम, प्रीतम पाटणकर, प्रणेश हमराज तसेच अनेक गावातील सरपंच, ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

या बैठकीत नागरिकांनी केलेल्या विविध तक्रारींवर चर्चा होऊन त्यांचे त्वरित निराकरणही करण्यात आले. केंद्र व राज्य शासनाच्या योजना तळागळापर्यंत प्रभावीपणे राबवण्यासाठी अधिकाऱ्यांनी सजग राहण्याच्या सूचना दिल्या.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment